Weather Update: दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची पुण्यात आज पुन्हा हजेरी; पुढील चार दिवस मध्यम पावसाचा अंदाज, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Weather Update: दमट हवामानामुळे उष्णतेची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज आहे. अधूनमधून हलक्या सरी कोसळत आहेत, मात्र मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

पुणे: महाराष्ट्रात मान्सून काही ठिकाणी दाखल झाला असला तरी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा शमल्यामुळे मान्सूनला लागणारी गती मंदावली आहे. परिणामी, महाराष्ट्रात मान्सून 9 जिल्ह्यांमध्ये अद्याप स्थिरावलेला नसल्याची माहिती आहे.पुढील दोन दिवसांमध्ये तापमानात 2 ते 3 अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. दमट हवामानामुळे उष्णतेची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज आहे. अधूनमधून हलक्या सरी कोसळत आहेत, मात्र मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
पुणे शहरात पावसाला सुरूवात
पुणे शहर आज सकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. काही भागात जोरदार पाऊस बरसला. पुण्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं असून दोन दिवस पावसाची शक्यता आहे. परिसरात पुढील पाचही दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे घाटमाथ्यावरही मध्यम पावसाचा अंदाज आहे. घाटमाथ्यावर मात्र पुढील चारही दिवस मध्यम पावसाचा अंदाज आहे. सातारा आणि घाटमाथा भागात आज हलक्या पावसाची शक्यता आहे. सातारा घाटमाथ्यावर पुढील पाचही दिवस मध्यम पावसाचा अंदाज आहे.
पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची आज पुन्हा हजेरी लावली. पुणे वेधशाळेकडून पुणे शहरासह घाटमाथ्यावर आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलं आहे. पुणे शहरातील अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळी-सकाळी अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची तारांबळ उडाली. आज पुणे शहरात दिवसभर पावसाची शक्यता आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार हजेरी लावली
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार हजेरी लावली. पुढील चार दिवस (1 जून ते 4 जून ) हवामानामध्ये काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे, तर अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी आपल्या भागातील हवामानाचा अंदाज घेऊन योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांमध्ये 1 ते 4 जूनपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 1 जून रोजी मुंबईसह ठाण्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तर पालघरमध्ये हलक्या सरीची शक्यता आहे. 2 ते 4 जून दरम्यान या तिन्ही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस कायम राहील. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. मात्र, पुढचे 48 तास रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर 2 ते 4 जून दरम्यान या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू राहील.
























