एक्स्प्लोर
पुण्यातील नऊ नामांकित डॉक्टरांच्या घर-क्लिनिकवर आयकरचे छापे
पुणे : पुणे आयकर विभागाच्या गुन्हे अन्वेषण पथकाने पुण्यातील नऊ नामांकित आणि तज्ज्ञ डॉक्टरांचं निवासस्थान आणि क्लिनिक्सवर छापे टाकले. नोटाबंदीच्या काळात नोटांचा भरणा आणि बिलिंग यांच्यात विसंगती आढळल्यामुळे हे छापे टाकण्यात आल्याची माहिती आहे.
शनिवारी सकाळी आणि दुपारी पुण्यातील डॉक्टरांच्या घरी आणि क्लिनिक्सवर छापेमारी करण्यात आली. अधिकाऱ्यांकडून दिवस-रात्र डॉक्टरांची झडती आणि चौकशी सूरु होती. यामध्ये काही डॉक्टर शहरातील नामांकित रुग्णालयांमध्ये काम करतात, तर काही स्वतःच्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करत आहेत. यापैकी दोन डॉक्टर जोडपी आहेत. अचानक नऊ डॉक्टरांवर आयकर विभागाच्या पडलेल्या या छाप्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
कोणाकोणाचा समावेश ?
अस्थिरोग व सांधेप्रत्यारोपण तज्ज्ञ (ऑर्थोपेडिक व जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन) डॉ. सचिन तपस्वी
स्त्रीरोग व आयव्हीएफ तज्ञ डॉ. सुनिता तांदुळवाडकर,
स्त्रीरोगतज्ञ डॉ. अविनाश फडणीस,
आयुर्वेद तज्ञ डॉ. समिर जमदाग्नी,
ह्रदयरोगतज्ञ डॉ. इश्वर झंवर
रेडिओलॉजिस्ट डॉ. केदार भाटे व त्यांच्या पत्नी डॉ. शुभांगी भाटे
ह्रदयरोगतज्ञ डॉ. सुहास हरदास व त्यांच्या पत्नी रेडिओलॉजिस्ट वर्षा सुहास हरदास
नऊही डॉक्टर शहरातील नामांकित रुग्णालयात कार्यरत असून नोटाबंदीच्या काळात नोटांचा भरणा व बिलिंग यांच्या माहितीत आढळलेल्या विसंगतीमुळे हे छापे टाकण्यात आल्याची माहिती आयकर विभागाचे (गुन्हे अन्वेषण विभाग) अतिरिक्त आयुक्त राजेश महाजन यांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
Advertisement