Pune Ganesh Visarjan : पुण्यातील विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवसापर्यंत लांबली; गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मानाच्या गणपतींची मिरवणूक 1 तास 24 मिनिटं आधी संपली
Pune Ganesh Visarjan : दरम्यान काल मध्यरात्री नंतर पुण्यातील श्रीमंत भाऊसासेब रंगारी, अखील मंडई , हुतात्मा बाबू गेणू या गणेश मंडळांच्या गणपतींचं विसर्जन पार पडलं आहे.

पुणे: पुण्यातील विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवशी देखील सुरुच असल्याचं चित्र दिसून आलं. काल रात्री बारा वाजता डीजे बंद करण्यात आल्याने अनेक गणेश मंडळांनी त्यांची विसर्जन मिरवणूक जागेवर थांबवण्याचा निर्णय घेतला होता. पहाटे सहा वाजता या मंडळांनी पुन्हा डीजे सुरु करुन विसर्जन मिरवणूक पुन्हा सुरु केली आहे. पोलीस ही विसर्जन मिरवणूक लवकर संपवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान काल मध्यरात्री नंतर पुण्यातील श्रीमंत भाऊसासेब रंगारी, अखील मंडई , हुतात्मा बाबू गेणू या गणेश मंडळांच्या गणपतींचं विसर्जन पार पडलं आहे.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती विसर्जन पहाटे 3.50 वाजता
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची मिरवणूक जल्लोषात पार पडल्यानंतर बाप्पाचं पर्यावरण पूरक हौदामध्ये विसर्जन करण्यात आलं. डेक्कन परिसरातील पांचाळेश्वर या घाटावर भाऊसाहेब रंगारी गणपतीचं विसर्जन करण्यात आलं आहे. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जय घोषात बाप्पांना निरोप देण्यात आला.श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती विसर्जन पहाटे 3.50 वाजता झालं.
2024 साली पुण्यातील मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक 10 वाजता सुरु झाली होती. त्यावेळी विसर्जन किती वाजता झालं होतं?
मानाचा पहिला कसबा गणपती - 4:35 वाजता म्हणजे 6 तास 35 मिनिटं मिरवणूक चालली
मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती - 5:10 वाजता म्हणजे 7 तास 10 मिनिटं मिरवणूक चालली.
मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती - 6:44 वाजता म्हणजे 8 तास 44 मिनिटं मिरवणूक चालली.
मानाचा चौथा तुळशीबाग गणपती - 7:15 वाजता म्हणजे 9 तास 15 मिनिटं मिरवणूक चालली.
मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती - 7:33 वाजता म्हणजे 9 तास 33 मिनिटं मिरवणूक चालली.
यंदा मिरवणूक 9:30 वाजता सुरु झाल्या आणि 5:39 वाजता म्हणजे 8 तास 09 मिनिटांनी मिरवणूक संपली तर गेल्या वर्षी 10 वाजता सुरु झालेल्या मिरवणुका 9 तास 33 मिनिटं चालली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मानाच्या गणपतींची मिरवणूक 1 तास 24 मिनिटं आधी संपली.
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक किती तास चालते?
2025 - मिरवणुकीला सुरूवात : सकाळी 9.30 वाजता सुरू झाली
2024 - एकूण 28 तास 45 मिनिटे
मिरवणुकीला सुरूवात : सकाळी 10.15 वाजता
मिरवणूक संपली : दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता
2023 – एकूण 30 तास 25 मिनिटे
2022 – एकूण 31 तास
























