Pune Crime: तो हातात वीट घेऊन आला अन्..., शुभदावर सपासप वार करणाऱ्या कृष्णाने चाकू टाकला, पुण्यातील IT कंपनीच्या पार्किंगमधील 'त्या' तरूणाचं होतंय कौतुक
Pune Crime: बघ्यांची गर्दी हातातला भलामोठा सुरा पाहून थांबली, कृष्णा शुभदाभोवती घिरट्या मारत राहिला आणि पुण्याच्या आयटी कंपनीतील VIDEO फुटेज समोर आलं आहे.
पुणे : पुण्यात (Pune Crime News) काही दिवसांपुर्वी एका नामांकित कॉल सेंटरच्या पार्किंगमध्ये चाकूने झालेल्या हल्ल्यात शुभदा कोदारे (Shubhada Kodare) (28 वर्षे) या तरुणीचा मृत्यू झाला. शुभदाच्या (Shubhada Kodare) सहकाऱ्यानेच तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. पैशाच्या वादातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी कंपनीच्या पार्किंगमध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी कृष्णा सत्यनारायण कनोजा (28 वर्षे) याला अटक करण्यात आली आहे. मात्र या वादाला पैशांची किनार असल्याने संतापलेल्या कृष्णाने शुभदावर हल्ला केला होता. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ देखील समोर आला होता. एका ठिकाणी कृष्णाने शुभदाच्या हातावर वार केले, त्याच्या हातामध्ये तो चाकू दिसत होता, आजुबाजूला बघ्याची मोठी गर्दी झाली होती, तिच्या हातावर वार करून तो तिच्या चहूबाजुने फिरत होता, आणि सर्वजण पाहत होते. त्यावेळी एक जण असा होता, जो ही घटना पाहिल्यानंतर त्याला थांबवण्यासाठी हातात विटा घेऊन आला होता, त्याला पाहताच कृष्णाने हातातला चाकू खाली टाकला, काही जण पुढे आले आणि त्यांनी कृष्णाला पकडलं.
कृष्णाने शुभदावरती वार करताना आणि ही घटना घडली ती सर्व कॅमेऱ्यात कैद झाला. याचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. मात्र यावेळी खाली विव्हळत बसलेल्या शुभदासह, हातात चाकू घेतलेल्या कृष्णासह, आजुबाजूच्या बघ्याच्या गर्दीकडं सर्वांचं लक्ष होतंच मात्र, कोणीही पुढे येण्याची हिम्मत करत नसताना एक तरून हातात विटा घेऊन कृष्णाच्या दिशेने जाताना दिसला आणि नकळत त्याने सर्वांचं लक्ष खेचून घेतलं. सध्या या तरूणाचं कौतुक होताना दिसत आहे. संतापलेल्या कृष्णाच्या हातातील तो धारदार भलामोठा चाकू पाहून कोणी त्याच्याजवळ जाण्याची हिंमत केली नसावी. मात्र, एक तरुण दोन हातात विटा घेऊन त्याच्या दिशेने जाताना पाठमोरा दिसतो.
कृष्णाने तो तरूण आपल्या दिशेने येतोय हे पाहून देखील तो चाकू हातातून फेकून दिला असावा, अशी शक्यता वर्तवली जातेय. मात्र त्याचवेळी तो शुभदाच्या हातातून हिसकावून घेऊन घेतलेल्या फोनवर बोलत होता. त्याने हातातील शस्त्र खाली टाकताच बघ्यांनी पुढे जाऊन त्याला धरलं. तर जखमी अवस्थेत शुभदाला रुग्णालयात दाखल केलं.
तो हातात वीट घेऊन आला अन्..., शुभदावर सपास वार करणाऱ्या कृष्णाने चाकू टाकला, पुण्यातील IT कंपनीच्या पार्किंगमधील 'त्या' तरूणाचं होतंय कौतुक, सदाशिव पेठेतील 'त्या' घटनेची झाली आठवण pic.twitter.com/wP0ABcVmyH
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) January 12, 2025
शुभदाने कृष्णाकडून खोटं कारण सांगून घेतलेले चार लाख रुपये
एकाच ठिकाणी काम करत असताना, कृष्णा आणि शुभदा या दोघांची चांगली ओळख झाली. कृष्णा हा लिपिक पदावर काम करायचा तर, शुभदा एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करायची. पुढे दोघांचा चांगली ओळख झाली मैत्री झाली. याच काळात शुभदाने वडील आजारी असल्याचे कारण सांगत त्यांच्या उपचारांसाठी कृष्णाकडून वेळोवेळी चार लाख रुपये घेतले होते. तिच्या वागण्यामुळे आणि सतत पैशांची मागणी करणयामुळे कृष्णाला संशय आला. त्यानंतर त्याने अडीच महिन्यांपूर्वी थेट कराडमध्ये जाऊन शुभदाच्या वडिलांची भेट घेतली. त्यावेळी शुभदाने वडिलांच्या उपचारांच्या नावाखाली आपल्याकडून पैसे घेतल्याचे त्याला समजले. तिचे खोटे बोलणे कृष्णाच्या जिव्हारी लागले. त्याच कारणातून त्याने शुभदावर चाकूने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या शुभदाचा उपचाराच्या दरम्यान मंगळवारी (दि. 7) मृत्यू झाला. याप्रकरणी शुभदा हिची बहीण साधना कोदारे (वय 26, रा. काळेवाडी फाटा, पिंपरी-चिंचवड)ने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय 28, रा. खैरैवाडी, शिवाजीनगर, मूळ यूपी) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मला शुभदाला ठार मारायचं नव्हतं
शुभदा मी तिला दिलेले पैसे वारंवार मागूनही परत देत नव्हती. मी तिला चाकूने धमकविल्यावर कंपनीतील अधिकारी किंवा पोलिस माझी दखल घेतील आणि पैसे परत मिळतील, या आशेने मी चाकू घेऊन आलो होतो. पण या हल्ल्यात तिचा मृत्यू होईल असे वाटले नव्हते, असे कृष्णा कनौजा याने सांगितले.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील नामांकित आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये शुभदा कोदारे हिच्यावर तिचा सहकारी कृष्णा सत्यनारायण कनोजा याने हल्ला केला. पुणे शहरातील येरवडा भागातील एका आयटी कंपनीत ही घटना घडली. यामध्ये शुभदा ही गंभीर जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
सदाशिव पेठेतील 'त्या' घटनेची झाली आठवण
सदाशिव पेठेतील पेरूगेट पोलिस चौकीजवळ 27 जून 2023 मध्ये सकाळच्या सुमारास एका तरुणाने महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून कोयत्याने वार करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तेथून जाणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील यांनी हल्लेखोराला अडवून तरुणीचा त्या जीव वाचवला होता. त्याचप्रमाणे, विमाननगरमधील कंपनीत शुभदावर कृष्णाने चाकूने वार करत होता. त्यावेळी बघ्यांनी गर्दी होती. त्यातून तो एकटात फक्त हातात विटा घेऊन पुढे आला होता.