एक्स्प्लोर

लॉटरीच्या बहाण्याने महिलेला गंडा, पुण्यात दुचाकी, सोन्याची चोरी

पुणे : लकी ड्रॉ मध्ये टीव्ही, फ्रीज आणि गाडी लागल्याचं सांगून पुण्यात एका महिलेला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्ता देण्याच्या बहाण्याने दुचाकी आणि सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना आंबेगाव पठार परिसरात घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत. मधुमती खेदाड गेल्या सहा महिन्यांपासून कात्रज सातारा बायपासला चहाची टपरी चालवतात. या ठिकाणी एक अज्ञात व्यक्तीने येऊन तुम्हाला लकी ड्रॉ मध्ये टीव्ही, फ्रिज, गाडी लागल्याचं सांगून महिलेची फसवणूक केली. 27 नोव्हेंबर रोजी एक व्यक्ती चहाच्या टपरीवर आली. दुकानातील गोळ्यांच्या लकी ड्रॉमध्ये तुम्हाला टीव्ही लागला असल्याचे सांगून त्याने महिलेकडे पत्ता मागितला. मात्र महिलेला घराचा पत्ता सांगता येत नव्हता. त्यामुळे महिला त्याला आपले घर दाखवण्यासाठी तिच्या दुचाकीवरून घरी घेऊन गेली. त्या व्यक्तीने घर पाहिले. त्यानंतर एका शोरुमध्ये जाऊन त्यांनी टीव्ही पाहिला. त्यानंतर ते परत चहाच्या टपरीकडे निघाले. त्यावेळी दोघांनी एका पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरले. पेट्रोल भरल्यानंतर या अनोळखी व्यक्तीने महिलेला ‘टीव्ही घेण्यासाठी ओळख द्यावी लागते. त्यासाठी तुम्ही तुमच्या कानातील दागिने काढून द्या. त्यावरुन मी सराफाची पावती आणतो असे सांगून सोन्याचे 20 हजार रुपयांचे दागिने व दुचाकी घेऊन गेला. मात्र, तो परत आलाच नाही. महिलेने बराच वेळ वाट पाहिली, मात्र तो येत नसल्याचे समजल्यानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांकडे धाव घेऊन घटनेची माहिती दिली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस अधिक तपास करत आहेत. महिलेला आरोपी ज्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गाडी घेऊन गेला, त्या ठिकाणचे सीसीटीव्ही काढून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मात्र अशा आमीषाला कोणी बळी पडू नये अस आवाहन पोलिसांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget