Pune Weather Update : चंद्रपूरपेक्षाही पुणं तापलं! पुण्यात राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद, दोन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता, सोलापूरातही तापमान वाढलं!
पुण्यातील तापमान चंद्रपूरपेक्षाही जास्त आहे. पुण्यातील तळेगाव ढमढेरे परिसरात राज्यातील उच्चांकी 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
पुणे : पुण्यातील तापमानात सातत्त्याने वाढ झाली आहे. या उकाड्यामुळे (Pune Weather Updater) पुणेकर चांगलेच हैराण झाले आह. राज्यातील सर्वाधिक तापमान पुण्यात नोंदवलं गेलं आहे. पुण्यातील तापमान चंद्रपूरपेक्षाही जास्त आहे. पुण्यातील तळेगाव ढमढेरे परिसरात राज्यातील उच्चांकी 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यासोबतच सोलापूरमध्येही 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. या वाढलेल्या तापमानामुळे दुपारी पुण्यात अनेक परिसरात शुकशुकाट दिसत आहे. सोबतच पुणेकरांच्या जीवाची लाहीलाही होताना दिसत आहे.
पुणे शहरातील अनेक भागातील तापमान चाळिशीवर गेले आहे. त्यामध्ये मगरपट्टा, शिवाजीनगर, पाषाणचा समावेश आहे. शिरूर 43.9 अंश सेल्सिअस आणि मगरपट्टा येथे 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वडगावशेरी, कोरेगाव पार्क, हडपसर, एनडीए, राज्यात सर्वात कमी किमान तापमान पुण्यातच 22.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. साधारण दरवर्षी प्रचंड तापणारा विदर्भातदेखील यंदा तापमानात वाढ झाली नाही आहे.
पुढील दोन दिवस पुण्यात तापमान वाढीची शक्यता
पुण्यात पुढील दोन दिवस तापमान वाढणार आहे, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडणे टाळावे. डिहायड्रेड होऊ नये म्हणून सतत पाणी प्यावे, अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत. दोन दिवसांनंतर वातावरणात बदल होणार आहे. तापमानात घट होणार असल्याचंदेखील हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
ढमढेरे : 44.0 अंश सेल्सिअस
शिरूर : 43.9 अंश सेल्सिअस
मगरपट्टा : 43.0 अंश सेल्सिअस
वडगावशेरी : 42.9 अंश सेल्सिअस
कोरेगाव पार्क : 42.9 अंश सेल्सिअस
पुरंदर : 42.7 अंश सेल्सिअस
राजगुरुनगर : 42.5 अंश सेल्सिअस
इंदापूर : 42.5 अंश सेल्सिअस
हडपसर : 42.1 अंश सेल्सिअस
चिंचवड : 41.7 अंश सेल्सिअस
शिवाजीनगर : 41.7 अंश सेल्सिअस
बारामती : 41.1 अंश सेल्सिअस
राज्यात अनेक जिल्ह्यात पारा 40 पार
गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअस पलिकडे गेला आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्याच्या पश्चिम आणि मध्य भागात सर्वाधिक उच्च तापमानाची नोंद झाली आहे. आज बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी रायगड, मुंबई उपनगर आणि ठाण्यासह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
इतर महत्वाची बातमी-
कुठे ऊन, कुठे पाऊस! ठाणे, मुंबईत उन्हाच्या झळा, IMD कडून यलो अलर्ट; विदर्भ, मराठवाड्यात पाऊस