Pun Weather Update : पुण्यात हुडहुडी; पाषाणमध्ये 10 अंश सेल्सिअस तापमान, ख्रिसमसमध्ये वातावरण कसं असेल?
पुण्यात थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. पहाटे तापमानात चांगलीच घसरण झाली आहे. पाषाणमध्ये 10 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे. हे वर्षातील सर्वात थंड तापमान आहे.
![Pun Weather Update : पुण्यात हुडहुडी; पाषाणमध्ये 10 अंश सेल्सिअस तापमान, ख्रिसमसमध्ये वातावरण कसं असेल? pune weather update chills grips the entire city pashan records coolest morning weather forecast Pun Weather Update : पुण्यात हुडहुडी; पाषाणमध्ये 10 अंश सेल्सिअस तापमान, ख्रिसमसमध्ये वातावरण कसं असेल?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/21/53ffba9ef44ee48a4a7982e7509f318c1703136596282442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पुण्यात थंडीचा कडाका(pune weather) जाणवू लागला आहे. पहाटे (Weather) तापमानात चांगलीच घसरण झाली आहे. पाषाणमध्ये 10 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे. हे वर्षातील सर्वात थंड तापमान आहे. तर शिवाजीनगरमध्ये तापमान 12 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून पुणेकर गुलाबी थंडी अनुभवत आहे.
हवामान शास्त्र विभाग पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज आणखी पुन्हा तापमानात घट होण्याची शक्यता आहे. ईशान्य वारे 24 तासांपासून पुण्यात दाखल होताना दिसत आहेत. मात्र, 22 डिसेंबरपासून (शुक्रवार) वाऱ्याचा पॅटर्न पुन्हा बदलण्याची शक्यता आहे. उत्तरेकडे निर्माण होऊन सायंकाळपासून किमान तापमानात काही दिवस हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील चोवीस तास ही थंडी कायम राहणार असून त्यानंतर किमान तापमानात किंचित वाढ होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याच्या पुणे येथील अंदाजानुसार व्यक्त करण्यात आला आहे.
'सध्या राज्यात आकाश निरभ्र अनुभवायला मिळत आहे. मात्र दक्षिण-आग्नेय द्वीपकल्पातून काही प्रमाणात आर्द्रता येत असल्याने आर्द्रतेत वाढ होत आहे. त्यामुळे पुढील 48 तास तापमान सध्याच्या पातळीवरच राहणार आहे. राज्यात उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव जाणवण्याची शक्यता असून या वेळी तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. पुणे शहरातही तापमानात घट होणार आहे, असं हवामान खात्यानं सांगितलं आहे.
पुढील काही दिवसा वातावरण कसं असेल?
21 डिसेंबर- आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे.
22 डिसेंबर-आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी / संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
23 डिसेंबर- आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
24 डिसेंबर- आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
25-डिसेंबर- आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
राज्यात पुन्हा तापमानात घट होण्याची शक्यता
मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात थंडी कमी झाली आहे. गेल्या आठवड्यात शहराचे तापमान 20 अंश सेल्सिअसच्या खाली गेले होते. मात्र सोमवारपासून मुंबईच्या किमान तापमानात 3 ते 4 अंशांनी वाढ झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, 25 डिसेंबरनंतर मुंबई आणि उपनगरात पुन्हा तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
मंगळवारी मुंबईतील IMD च्या सांताक्रूझ हवामान केंद्रात किमान तापमान 23.7 अंशांवर पोहोचले, जे सामान्यपेक्षा सहा अंशांनी जास्त आहे. तर कुलाबा येथील हवामान केंद्रात किमान तापमान 19.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. यापूर्वी 12 डिसेंबर रोजी हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली होती, जी 19.4 अंश होती.
इतर महत्वाची बातमी-
Maharashtra Weather : मुंबई, पुण्यासह राज्यात गारठा वाढला, नाताळनंतर थंडी आणखी वाढणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)