Pune Water : दिलासादायक! शहराची पाण्याची चिंता मिटली; खडकवासला धरणक्षेत्रात पाणीसाठा वाढला, वाचा आजची आकडेवारी
Pune Water : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे शहराची पिण्याची पाण्याची चिंता आता मिटली आहे. पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे.
![Pune Water : दिलासादायक! शहराची पाण्याची चिंता मिटली; खडकवासला धरणक्षेत्रात पाणीसाठा वाढला, वाचा आजची आकडेवारी Pune Water Heavy Rain Boosts Water Storage In Khadakwasla Dam Project Pune Water : दिलासादायक! शहराची पाण्याची चिंता मिटली; खडकवासला धरणक्षेत्रात पाणीसाठा वाढला, वाचा आजची आकडेवारी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/18/e90612d36d4e42485ad4255f7787e5d61721274841461442_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे शहराची पिण्याची पाण्याची चिंता आता मिटली आहे. पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस (Pune Rain) झाल्यामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. खडकवासला धरणक्षेत्रातील वरसगाव, टेमघर आणि पाणशेत या धरण परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. धरण परिसरात झालेल्या चांगल्या पावसामुळे (Pune Rain) खडकवासला धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा जास्त आहे. त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.
हवामान विभागाने मुसळधार पावसाची (Pune Rain) शक्यता व्यक्त केल्यामुळे लवकरच धरणसाठी पुर्णत: भरण्याची शक्यता आहे. खडकवासला धरणक्षेत्रात पाणीसाठा वाढल्याने पुणेकरांची पाण्याची चिंता आता मिटली आहे. खडकवासला धरण क्षेत्रातील वरसगाव टेमघर पानशेत आणि चार धरणामध्ये आठवडाभरापासून झालेल्या पावसामुळे पाणीसाठा वाढल्यामुळे पाण्याचं संकट कमी झालं आहे.
खडकवासला क्षेत्रात आता 11.79 टीएमसी पाणीसाठा आहे. तर गेल्या वर्षी त्याच वेळी हा पाणीसाठा 9.52 टीएमसी इतका होता. पुणे शहराची पाण्याची चिंता मिटली असून हवामान खात्याकडून अजूनही चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने लवकरच धरणसाठा पूर्णपणे भरेल अशी शक्यता आहे.
पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट
आज पुणे शहराला पावसाचा पावसाचा (Pune Rain) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यासह पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदूर्ग, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्येही अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये घाट परिसरात अतिमुसळधार तर इतर भागांत मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज
मोसमी पावसासाठी पोषक वातावरण असल्यामुळे सुरू असलेल्या जुलै महिन्यात राज्यासह देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जुलै महिन्यात देशभरात सरासरीच्या 106 टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. राज्यात कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. चालू आठवड्याच्या सुरूवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र आता पुन्हा एकदा पावसाने विश्रांती घेतल्याचं दिसून येत आहे.
शेतीच्या कामांना वेग
पुण्यासह राज्याच्या काही काही भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकऱ्यांनी पेरणींच्या कामांना सुरूवात केल्याचं चित्र आहे. दरम्यान, अनेक भागात अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. त्या भागात चांगल्या पावसाची गरज आहे. शेतकरी पावसाची प्रतिक्षा करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)