एक्स्प्लोर

पुण्यात विसर्जन मिरवणूक रखडली; मंडई , शारदा गणपती, भाऊसाहेब रंगारी मंडळाचं विसर्जन बाकी

विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांमध्ये नंबर आधी कोणाचा यावरुन वाद झाला  त्यामुळे विसर्जन मिरवणूक रेंगाळली.

पुणे :  अकरा दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यासाठी (Pune Ganesh Visarjan 2024)  मंगळवारी  निघालेल्या विसर्जन मिरवणुका 22 तासांनंतर आजही सुरू आहेत. पुण्यातील मानाच्या सर्व गणपतींचे आणि  दगडूशेठ हलवाई गणपतीचे रात्रीत विसर्जन झाले. मात्र त्यानंतर पुण्याची विसर्जन मिरवणूक रखडली आहे.  अखिल मंडई मंडळ, शारदा गणपती मंडळ, भाऊसाहेब रंगारी मंडळाचं विसर्जन  अद्याप बाकी आहे.  

पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींना भावपूर्ण निरोप देण्यात आलंय.. मानाचा पहिला कसबा गणपती, मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी, मानाचा तिसरा गुरुजी तालीम, मानाचा चौथा तुळशीबागेतील बाप्पा तर मानाचा पाचवा केसरीवाड्यातील गणपतीचं विसर्जन करण्यात आलंय. पुण्याची गणपची विसर्जन मिरवणूक मंगळवारी   सकाळी   10:30 वाजता सुरू झाली होती.  

विसर्जन मिरवणुकीत आधी नंबर कोणाचा  

मंडई , बाबू गेणू, भाऊसाहेब रंगारी या महत्त्वाच्या गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणूका मध्यरात्र उलटून गेल्यावर देखील अजून सुरूच झाली नाही. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे नऊच्या दरम्यान विसर्जन झाले. मात्र त्यानंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांमध्ये नंबर आधी कोणाचा यावरुन वाद झाला  त्यामुळे विसर्जन मिरवणूक रेंगाळली. या मंडळांची मिरवणूक सुरू होत नसल्याने पाठीमागे असलेली मंडळेही रखडली. 

मिरवणूक लवकरात लवकर संपवू : पुणे पोलीस आयुक्त

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, मिरवणुकीचं योग्य नियोजन करण्यात आले  आहे. मात्र पुण्यातील मिरवणुकीत अनेक मंडळांनी लेसर लाइटचा वापर केला आणि सोबतच डीजेचा वापर केला आहे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस तैनात आहेत.  मिरवणूक लवकरात लवकर संपवू, असाही त्यांनी सांगितलं. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे विसर्जन मिरवणुका उशिरापर्यंत चालणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

मानाचा पहिला - कसबा गणपती

  • 10:30 - मिरवणुकीची सुरुवात
  • 11:10 - बेलबाग चौकात 
  • 3:35 - अलका चौक
  • 4:32 - नटेश्वर घाटावर विसर्जन

मानाचा दुसरा - तांबडी   जोगेश्वरी

  • 10:40 - मिरवणुकीला सुरुवात
  • 12:00 -बेलबाग चौक
  • 4:12 - अलका चौक
  • 5:10 - नटेश्वर घाटावर विसर्जन

मानाचा तिसरा - गुरुजी तालीम

  • 11:10 - मिरवणुकीला सुरुवात
  • 1:12 - बेलबाग चौक
  • 5:16 - अलका चौक 
  • 6:43 - नटेश्वर घाटावर विसर्जन 

मानाचा चौथा - तुळशीबाग

  • 11:50 - मिरवणुकीला सुरुवात
  • 2:20 - बेलबाग चौक
  • 6:17 - अलका चौक
  • 7:12 - पाताळेश्वर घाटावर विसर्जन 

मानाचा पाचवा - केसरीवाडा

  • 12:25 - मिरवणुकीला सुरुवात
  • 3:23 - बेलबाग चौक
  • 6:27 - अलका चौक
  • 7:38 - पाताळेश्वर घाटावर विसर्जन

हे ही वाचा :

पुण्यात भव्य-दिव्य रांगोळीने बाप्पांचे स्वागत; सामाजिक संदेश देणारी अफलातून कलाकृती

महत्त्वाच्या बातम्या

रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget