एक्स्प्लोर
व्हॅक्युम क्लिनरमध्ये अडकून महिलेचे केस कातडीसह उपटले
ही घटना 8 डिसेंबरला घडली होती. परंतु याप्रकरणी तिघांवर काल (शुक्रवार) रात्री चाकण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

पिंपरी चिंचवड : सफाई काम करणाऱ्या महिलेच्या डोक्याचे केस कातडीसह व्हॅक्युम क्लिनरने उपटून निघाल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या चाकणमध्ये घडली आहे. नानेकरवाडी येथील ओबीएसजी कंपनीत काम करणाऱ्या या महिलेचं सीमा राठोड असं नाव आहे.
ही घटना 8 डिसेंबरला घडली होती. परंतु याप्रकरणी तिघांवर काल (शुक्रवार) रात्री चाकण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
सीमा नेहमीप्रमाणे 8 डिसेंबर 2016 रोजी सफाई काम करत होत्या. तिथेच पाईप साफ करण्यासाठी असणाऱ्या व्हॅक्युम क्लिनरचे फॅन सुरु होते. त्याच फॅनच्या हवेने त्यांचे डोके खेचले गेले. कचरा साफ करणाऱ्या या व्हॅक्युम क्लिनरने सीमा यांच्या डोक्याचे केस अक्षरशः कातडीसह उपटून काढले. त्यांच्यावर 165 टाक्यांची मोठी शस्त्रक्रिया झाली असून त्या यातून सुखरुप बचावल्या आहेत.
या घटनेनंतर कंपनीने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही उपाययोजना केल्या नव्हत्या असं पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळेच घटनेच्या एक महिन्यानंतर मॅनेजर, सुपरवायझर आणि सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालकाची चौकशी करुन ते दोषी आढळल्यास त्यांच्यावरही गुन्हा दाखल करु, असं पोलिस म्हणाले.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
