एक्स्प्लोर
पुण्यात बाईक टेम्पोवर आदळून अपघात, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
विपुल आपल्या मित्रांसह बुलेटवर जात असताना बावधन भागात मुंबई-बंगळुरु महामार्गावर टेम्पो उभा करण्यात आला होता. विपुलला अंधारात टेम्पो न दिसल्याने बुलेट टेम्पोवर जोरात आदळली.
पुणे : मुंबई-बंगळुरु महामार्गावर पुण्याजवळ झालेल्या अपघातात तीन विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले आहेत. हायवेवर उभ्या असलेल्या टेम्पोला धडकल्यामुळे दुचाकीवरील तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला.
मंगळवारी रात्री एक वाजताच्या सुमारास पुण्यातील बावधन परिसरात ही घटना घडली. 25 वर्षीय विपुल राजसिंग, 19 वर्षीय अमन राज आणि 18 वर्षीय अश्विनकुमार अगरवाल यांचा अपघातात मृत्यू झाला.
रजतराज सिंग यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पोचालक शिवा राठोड याच्यावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
विपुल आपल्या मित्रांसह बुलेटवर जात असताना बावधन भागात मुंबई-बंगळुरु महामार्गावर टेम्पो उभा करण्यात आला होता. विपुलला अंधारात टेम्पो न दिसल्याने बुलेट टेम्पोवर जोरात आदळली. यामध्ये तिघेही जण गंभीर जखमी झाले.
काही वेळात त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे. हिंजवडी पोलिस पुढील तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement