Pune Terrorist Case : पुण्यात NIA ची मोठी कारवाई; दहशतवाद्यांनी वापरलेल्या चार मालमत्तेवर जप्तीची कारवाई
ISIS दहशतवाद प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एन आय ए) पुण्यात कारवाई (Pune Terrorist Case) मोठी कारवाई केली आहे. एनआयएने पुण्यातील कोंढवा येथील मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली आहे.

पुणे: ISIS दहशतवाद प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एन आय ए) पुण्यात कारवाई (Pune Terrorist Case) मोठी कारवाई केली आहे. एनआयएने पुण्यातील कोंढवा येथील मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली आहे. एनआयएने पुण्यातील कोंढवा भागात असलेल्या मिठानगर परिसरातील 4 मालमत्तेजवळ नोटिसंचे फलक उभारले आहेत.
पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांनी या मालमत्ता दहशतवादी कृत्य करण्यासाठी वापरण्यात आल्या होत्या. या ठिकाणी दहशतवादी राहत होते. शिवाय या ठिकाणी ते अनेक प्लॅनदेखील करत होते. याच इमारतीत दहशत वाद्यांनी बॉम्ब बनवण्याचा प्लॅन आखला होता आणि ती रेसिपी लिहून ठेवली होती. या सगळ्या कामासाठी या इमारती वापरल्या असल्याने NIA कडून जप्त करण्यात आल्या आहेत.
18 जुलै रोजी पुणे पोलिसांनी 3 दहशतवाद्यांना कोथरूड मधून अटक केली होती.पुणे आय एस आय एस (ISIS) मोड्युल प्रकरणी 11 जणांच्या विरोधात एन आय ने केले आहे चार्जशीट दाखल केली आहे. यात आरोपी मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, मोहम्मद शाहनवाज आलम, एमडी रिझवान अली, कादिर दस्तगीर पठाण, सिमाब काझी, झुल्फिकार अली बडोदावाला, अब्दुल्ला फैयाज शेख, तल्हा लियाकत खान, नाचन आणि आकिफ नाचन यांचा समावेश आहे.
या दहशतवाद्यांचं सांगली कनेक्शन समोर आलं होतं. या मोहम्मद इमरान मोहम्मद युनूस खान, मोहम्मद याकूब साकी या 2 दहशतवाद्यांना चोरीच्या प्रकरणात पकडलं होतं. हे दोघेही मोस्ट वॉन्टेड आरोपी होते. त्यांनी थेट सोन्याच्या आणि साडीच्या दुकानात चोरी केली होती आणि चोरलेल्या पैशातून बॉम्ब बनवण्याचं साहित्य विकत घेतलं होतं.
ISIS, ज्याला इस्लामिक स्टेट (IS), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट (ISIL), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS), Daish, इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रांत (ISKP), ISIS विलायत खोरासान, आणि इस्लामिक स्टेट म्हणूनही ओळखले जाते. इराक आणि शाम खोरासान (ISIS-K), सक्रियपणे भारतविरोधी अजेंडा राबवत आहे आणि हिंसक कृत्यांच्या मालिकेद्वारे देशभरात दहशत आणि हिंसाचार पसरवत आहे. या सगळ्या संस्थांमध्ये हे दोघे काही प्रमाणात संलग्न असल्याचं समोर आलं आहे.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
