Tanaji Sawant In Pune : "नशीब पुण्यात आमदार नाही, अन्यथा सोलून काढला असता", पुण्यातील शिवसैनिक आक्रमक
पुण्यातील शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. नशीब पुण्यात आमदार नाही, अन्यथा सोलून काढला असता, असं विधान पुण्याचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी केलं आहे.
Tanaji Sawant In Pune : शिवेसेनेचे भूम-परांडा तालुक्याचे बंडखोर आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची घटना घडली. तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयावर हल्ला करण्यात आला असून, त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. त्या हल्ल्यात सहभागी असलेले शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. नशीब पुण्यात आमदार नाही, अन्यथा सोलून काढला असता, असं विधान पुण्याचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी केलं आहे.
ही फोडाफोडीची सुरुवात आम्ही तानाजी सावंतांपासून केली आहे. जे जे आमदार फुटले त्यांना चोख उत्तर प्रत्येक शिवसैनिक देणार, असल्याचंही त्यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यातील अश्रू हे सगळ्या जनतेच्या डोळ्यातील अश्रू आहे. त्याच्या डोळ्यातील अश्रू कोणताच शिवसैनिक बघू शकत नाही, असंही ते म्हणाले.
शिवसेनेच्या आमदारांनी बंडोखोरी केल्यामुळं शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. बंडखोर आमदारांच्या विरोधात पवित्रा शिवसैनिक पवित्रा घेत असल्याचे चित्र दिसत आहे. तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यलयावर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. या घटनेनंतर तानाजी सावंत यांच्या पुण्यातील निवासस्थाना बाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
तानाजी सावंतांचा इशारा
आमचे गटनेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही संयम बाळगून आहोत. एकदा हा राजकीय प्रश्न सुटला की येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा शिवेसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी दिला आहे. शिवेसेनेचे भूम-परांडा तालुक्याचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयावर हल्ला करण्यात आला असून, त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 2014 साली शिवसेना भाजपच्या सत्तेत तानाजी सावंत यांच्यावर मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, 2019 ला महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर शिवसेनेनं तानाजी सावंत यांनी मंत्रीपदाची संधी दिली नाही. तेव्हापासूनच तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा होती. अखेर बंडखोरी करत ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत.