Pune Crime News: चोरी केलेलं 6 तोळे सोनं, रोख रक्कम जप्त; दोन मित्रांसह चोराला अटक
20 जून रोजी बिबवेवाडी येथील सोबा सवेरा अपार्टमेंटमधील बंद फ्लॅटमधून 1.4 लाख रुपये रोख आणि 600 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेले होते
![Pune Crime News: चोरी केलेलं 6 तोळे सोनं, रोख रक्कम जप्त; दोन मित्रांसह चोराला अटक Pune: Stolen Ornaments Worth Rs 30 Lakh Recovered, Thief Alongwith Two Friends Arrested Pune Crime News: चोरी केलेलं 6 तोळे सोनं, रोख रक्कम जप्त; दोन मित्रांसह चोराला अटक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/05/43d20d25a50351602a94ee24bbc6cab91657004440_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune Crime update: पुण्यातील बिबवेवाडी परिसरात घरातून रोकड आणि दागिने चोरणाऱ्या एका चोरट्याला गुन्हे शाखा आणि बिबवेवाडी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. गुन्ह्यात मदत करणाऱ्या त्याच्या साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. 34 वर्षीय मुश्तफा उर्फ बोना शकील अन्सारी, 29 वर्षीय जुनैद रिझवान सैफ आणि 31 वर्षीय हैदर कल्लू शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रोख रक्कम आणि दागिने चोरणाऱ्या अन्सारी याला गुन्हे शाखेने अटक केली, तर अन्य दोन आरोपींना पोलिस ठाण्याच्या पथकाने अटक केली.
20 जून रोजी बिबवेवाडी येथील सोबा सवेरा अपार्टमेंटमधील बंद फ्लॅटमधून 1.4 लाख रुपये रोख आणि 600 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. सीसीटीव्ही फुटेज आणि सोसायटी सदस्यांच्या चौकशीच्या मदतीने गुन्हे शाखा आणि पोलिस ठाण्याच्या शोध शाखेच्या पथकाने अन्सारी आणि त्याच्या दोन मित्रांना अटक केली. अन्सारीवर 2019 पूर्वी घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तपासादरम्यान आम्हाला कळले की जुनैद आणि हैदरने अन्सारीला दागिने चोरण्यात आणि लपविण्यास मदत केली. त्यामुळे त्यांना अटकही करण्यात आली. आम्ही चोरीचे दागिने जप्त केले आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्त (झोन 5) नम्रता पाटील यांनी दिली.
अतिरिक्त पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, डीसीपी नम्रता पाटील, एसीपी राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. या पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे तसेच पोलीस कर्मचारी संतोष जाधव, सतीश मोरे, श्रीकांत कुलकर्णी, अतुल महांगडे, शिवाजी येवले, तानाजी सागर आणि राहुल शेलार यांचा समावेश होता. पुण्यात गुन्ह्यांचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यात चोरी, लैंगिक अत्याचार, अमली पदार्थांची विक्री आणि सोशल मीडियाच्या माध्यामातून होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या जास्त आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)