Pune School News : एक शाळा, एक शिक्षक, एकच विद्यार्थिनी; एका विद्यार्थिनीला शिकवण्यासाठी शिक्षिकेचा डोंगरदऱ्यातून 45 किमीचा प्रवास
एकाच विद्यार्थिनीला शिकवण्यासाठी पुण्यातील शिक्षिका डोंगरदऱ्यातून 45 किमीचा प्रवास करते. मंगला ढवळे असं या शिक्षिकेचं नाव आहे तर सिया शेलार असं या झेडपी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचं नाव आहे.
पुणे : झेडपी शाळेतील विद्यार्थ्यांचा आणि (school) त्यांच्या पालकांचा संघर्ष आपण कायम पाहिला आहे. मात्र विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पुण्यातील एका शिक्षिकेचा (Teacher) प्रवास वाखणण्याजोगा (Pune School News) आहे. पुणे जिल्ह्यातील एक शिक्षिका एकाच विद्यार्थिनीला शिकवण्यासाठी तब्बल 45 किलोमीटरटचा प्रवास करते. मुळशी तालुक्यातील अटलवाडी गावात ही शाळा आहे. या शाळेची, विद्यार्थिनीची आणि या चिकाटी असणाऱ्या शिक्षिकेची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. जिल्ह्यातील 3,638 प्राथमिक शाळांपैकी 21 शाळांमध्ये एकच विद्यार्थी आणि एकच शिक्षक आहे.
मंगल ढवळे असं या शिक्षिकेचं नाव आहे तर सिया शेलार असं या झेडपी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचं नाव आहे. या शाळेत पोहचण्यासाठी ढवळे यांना 45 किलोमीटरचा डोंगरातून प्रवास करावा लागतो. मंगल ढवळे या पती आणि दोन मुलांसह पुण्याजवळ राहतात. दररोज त्या 45 किलोमीटरचा प्रवास करतात आणि कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या देखील पेलतात. त्यांचे पतीही व्यवसायाने शिक्षक असून ते सकाळी शाळेत जातात, तर त्यांची 12 वर्षांची मुलगीदेखील शाळेत शिकते. दुसरा मुलगा लहान असल्यामुळे त्या मुलाला मंगल या पाळणा घरात ठेवतात. गावात नेटवर्क नसल्याने पोटच्या पोराशी दिवसभर संपर्क साधता येत नाही किंवा पतीशी देखील संपर्कात राहता येत नाही. त्यामुळे त्यांना आपल्या मुलांची कायम काळजी वाटत राहते, असं त्या सांगतात.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, पुणे जिल्ह्यातील पानशेतमध्ये (cluster school) क्लस्टर शाळा आहे. त्या शाळेत आजूबाजूच्या कमी संख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांची एकत्र शाळा भरते. अटाळवाडीजवळ अशी शाळा सुरु झाल्यास सिया सारख्या विध्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो, परंतु त्यासाठी बसची सोय करणे गरजेचे आहे. वर्गात एकच विद्यार्थी असला तर समूह एक्टिविटी, खेळ घेणे व अभ्यासात स्पर्धात्मक वातावरण देण्यात अडचणी येत असल्याचं शिक्षण विभागाचं मत आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, पुणे जिल्ह्यातील 3,638 प्राथमिक शाळांपैकी 21 शाळांमध्ये एक विद्यार्थी आणि एक शिक्षक आहे. अटलवाडी शाळा ही देखील या 21 शाळांपैकी एक आहे. यातील बहुतांश शाळा जिल्ह्यातील डोंगराळ तालुक्यांमध्ये आहेत. या भागांमध्ये रोजगाराच्या संधी नसल्यामुळे लोक शहरांकडे स्थलांतरित झाले आहेत आणि त्यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या खूपच कमी आहे. अटलवाडीत सुमारे 40 घरे असली तरी केवळ 15 घरांत लोक राहतात आणि गावातील काम करतात.
हेही वाचा-