Teachers Day : हसत खेळत शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड, विद्यार्थ्यांमध्ये रमत पुण्याच्या मृणाल गांजाळे यांनी मिळवला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार; कशी चालते शाळा?
पुण्यातील मृणाल गांजाळे यांना यंदा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. मृणाल गांजाळे यांनी त्यांच्या शाळेत राबवलेल्या उपक्रमामुळे आणि नव्या नव्या संकल्पनांमुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला.
![Teachers Day : हसत खेळत शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड, विद्यार्थ्यांमध्ये रमत पुण्याच्या मृणाल गांजाळे यांनी मिळवला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार; कशी चालते शाळा? Teachers Day special pune zp teacher mrinal ganjale announced the national teacher award 2023 zp school mahalunge Teachers Day : हसत खेळत शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड, विद्यार्थ्यांमध्ये रमत पुण्याच्या मृणाल गांजाळे यांनी मिळवला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार; कशी चालते शाळा?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/05/4ea4027ff3ee44529fd4f8aeac486e9f1693911107109442_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पुण्यातील मृणाल गांजाळे यांना यंदा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. मृणाल गांजाळे यांनी त्यांच्या शाळेत राबवलेल्या उपक्रमामुळे आणि नव्या नव्या संकल्पनांमुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला. देशातील 45 शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला असून महाराष्ट्रतून त्या एकमेव शिक्षिका आहे. ज्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव महाळुंगे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका आहेत. या शिक्षिकेने असे कोणते उपक्रम राबवले आणि मुलांच्या शिक्षण पद्धतीत कोणते बदल केले, याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
मुलांना सध्या खेळाच्या मार्फत शिक्षण देणं गरजेचं आहे. शिकण्यात जेव्हा आनंद जोडला जातो, तेव्हा शिक्षण खऱ्या अर्थानं दर्जेदार होतो. अध्ययन-अध्यापन प्रकियेला अधिकाधिक विद्यार्थीकेंद्रीत आणि आनंददायी बनवण्यावर माझा भर आहे. शिक्षणाचा विद्यार्थ्यांना भविष्यात वापर करता यावा, पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे शिक्षण मिळावं, त्यांच्यात 21 व्या शतकातील कौशल्ये विकसित व्हावीत यासाठी रोजच्या उपयोगात येणारं शिक्षण देण्याचं उद्दिष्ट आहे. ते साधण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत, असं त्या सांगतात.
शिक्षणात गेमिफिकेशन इन एज्युकेशन प्रकल्प, AR-VR चा वापर, कशी चालते शाळा?
गांजाळे-शिंदे यांनी अध्ययन - अध्यापन प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञानाचा अभिनव वापर जगभरातील विद्यार्थ्यांना व्हर्चुअल प्रकारे शिक्षण दिलं जातं, गेमिफिकेशन इन एज्युकेशन प्रकल्प, AR-VR चा वापर, असे वेगवेगळे तंत्रज्ञानावर आधारित प्रयोग केले. ऑनलाइन शिक्षण, इतर देशातील शाळांशी थेट विद्यार्थ्यांचा संवाद, वेबसाइट मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर, राज्यातील इतर शिक्षकांना प्रशिक्षण, कोरोना काळात शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन अत्याधुनिक शिक्षण दिले आहे.
अनेक ठिकाणी मार्गदर्शन म्हणून काम...
पंतप्रधान विद्या वाहिनीवर शिक्षकांसाठी मार्गदर्शन पर सेशन मध्ये CIET-NCERT मार्फत तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले. मागील वर्षी मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी देखील दिल्ली येथे त्यांच्या शैक्षणिक कामाचे कौतुक करून सन्मान केला. राष्ट्रीय आय.सी.टी मेलामध्ये देखील त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. कुटुंबीयांनी तसेच पिंपळगाव ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिल्याचं शिक्षिका गांजाळे शिंदे सांगतात.
अनेक पुरस्कार मिळालेत...
मृणाल गांजाळे या गेली 14 वर्षे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत असून त्यांना 2019 मध्ये राष्ट्रीय आईसीटी पुरस्कार मिळाला आहे. 2021मध्ये सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. तर 2023चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार यांना जाहीर झाला आहे. गांजाळे यांची उपक्रमशील शिक्षिका म्हणून ओळख आहे. त्यांच्या शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग असून एकूण 480 विद्यार्थी शिक्षण घेत आहे.
इतर महत्वाची बातमी-
शिक्षणापेक्षा मोठे वरदान नाही... आज शिक्षक दिन, तुम्हाला इतिहास माहितीय?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)