Pune School: स्कूल चले हम! पानशेतमध्ये 16 शाळेतील विद्यार्थी एकाच शाळेत शिकणार; शाळा एकत्रीकरणाचा राज्यातील पहिलाच प्रयोग
पुण्यातील जिल्ह्यात 20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याऐवजी शाळा एकत्रीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. वेल्हे तालुक्यातील पानशेत गावात ही शाळा उभारली असून लवकरच ग्रामीण भागातील विद्यार्थी या शाळेत शिक्षणासाठी दाखल होणार आहे.
Pune School: पुण्यातील (Pune) जिल्ह्यात 20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याऐवजी शाळा (school) एकत्रीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जिल्हा परिषदेचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग असणार आहे. 20 पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्येच्या शाळांचा एकत्रीकरणाचा पर्याय देण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सोळा शाळांची एक शाळा होणार आहे. वेल्हे तालुक्यातील पानशेत गावात ही शाळा उभारली असून लवकरच ग्रामीण भागातील विद्यार्थी या शाळेत शिक्षणासाठी दाखल होणार आहे.
पटसंख्या कमी असलेल्या शाळेत दोनच शिक्षकांची नियुक्ती केली जात होती. त्यामुळे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गात आणि दोनच शिक्षणांकडून शिक्षण दिलं जात होतं. या सगळ्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत होता. त्यात 20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करावा असा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे ग्रामीण परिसरातील अनेक विद्यार्थी शाळेअभावी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता होती. मात्र यावर पुणे जिल्हा परिषदेने उत्तम पर्याय काढून 16 शाळेतील विद्यार्थ्यांना एकाच शाळेत एकत्र शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे, असं पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनी सांगितलं आहे.
'शाळा एकत्रीकरणाला पालकांचा विरोध होता'
20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याला पालकांंनी आणि विद्यार्थ्यांनी ग्रामीण पातळीवर आंदोलनं करत विरोध दर्शवला होता. शाळा बंद करु नका? नाही तर मुलांना शिक्षण कसं मिळेल? शाळा एकत्रीकरण केलं तर ती शाळा गावापासून लांब असेल तर जाण्या-येण्याची सोय कशी केली जाणार?, असे अनेक प्रश्न पालकांनी उपस्थित केले होते. त्यानंतर अनेक पालकांची समजूत काढून त्यांना शाळेचं आणि एकत्र शिक्षणाचं महत्व पटवून दिलं त्यानंतर पालकांनीही या शाळा एकत्रीकरणाला परवानगी दिली होती.
'एकत्र शिकल्याने विद्यार्थ्यांना विकास'
20 पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये एका वर्गात कमी विद्यार्थी असायचे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा विकास त्यांची विचारक्षमता खुंटण्याची भीती असते. मात्र या मोठ्या शाळेत विद्यार्थी अनेक विद्यार्थ्यांबरोबर शिक्षण घेणार आहेत. याचा फायदा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावर होणार आहे. विद्यार्थ्यांचं भविष्य उज्वल होणार आहे.
'पुणे जिल्ह्यातील 1000 शाळा बंद होण्याची शक्यता'
पुणे जिल्हा परिषदेने 20 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या सुमारे 1,000 शाळा शोधल्या आहेत. शाळा विलिनीकरणाच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील 3,629 पैकी 1,000 हून अधिक शाळा बंद होण्याची शक्यता आहे. शाळा विलिनीकरणाच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील 3,629 पैकी 1,000 हून अधिक शाळा बंद होण्याची शक्यता आहे.