एक्स्प्लोर

नऊ वर्षाचा मुलगा राहायला आला, 21 व्या वर्षी पहिल्यांदा अनैतिक संबंध, 32 वर्षापर्यंत अक्षयची मोहिनी वाघांशी जवळीक 

सतिश वाघ हत्या प्रकरणात मोठे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. वाघ यांची हत्या करण्याचा कट त्यांची पत्नी मोहिनी वाघ यांनीच रचल्याचे समोर आले आहे.

पुणे : सतिश वाघ हत्या प्रकरणामुळे संपूर्ण पुणे शहर हादरलं आहे. 9 डिसेंबर रोजी त्यांचे अगोदर अपहरण झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर एकूण 70 वार करून त्यांची हत्या करण्यात आली. दरम्यान, अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यामुळे अक्षय जावळकर तसेच सतिश वाघ यांच्या पत्नीनेच त्यांचा काटा काढल्याचे समोर आले आहे.  

अक्षय जावळकर आणि मोहिनी वाघ यांच्यात अनैतिक संबंध

सतिश वाघ हत्या प्रकरणातील अक्षय जावळकर या आरोपीचे वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिच्याशी अनैतिक संबंध होते. याच अनैतिक संबंधाला अडसर ठरत असल्याने वाघ यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे अक्षय जावळकर हा वाघ कुटुंबीयांच्या घरात भाड्याने राहात होता असे समोर आले. 

जावळकर कुटुंब वाघ दाम्पत्याच्या घरी भाड्याने राहायला आले

अक्षय जावळकर याचे कुटुंबीय वाघ कुटुंबाच्या घरी गेल्या अनेक वर्षांपासून भाड्याने राहायचे. 2001 साली अक्षय जावळकरचे आई-वडील वाघ दाम्पत्याच्या खोलीत भाड्याने राहण्यासाठी आले होते. त्यावेळी अक्षय जावळकरचं वय फक्त 9 वर्षे होतं. सतिश वाघ आणि मोहिनी वाघ यांचा मुलगादेखील अक्षय जावळकरच्याच वयाचा होता. पुढे अक्षय जावळकर आणि वाघ दाम्पत्याच्या मुलाची मैत्री झाली. म्हणजेच अक्षय जावळकर 9 वर्षांचा असल्यापासून त्याचे वाघ दाम्पत्याशी जवळचे संबंध होते. 

कित्येक वर्षांपासून होते अनैतिक संबंध

त्यानंतर अक्षय जवळकर 2013 मध्ये 21 वर्षांचा झाला. तेव्हापासून अक्षय आणि मोहिनी वाघ यांची जवळीक वाढली. तेव्हापासून या दोघांमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. दरम्यानच्या काळात अक्षय जावळकर सिव्हिल इंजिनिअर झाला. त्याने त्याचा व्यवसायही चालू केला. या काळातही अक्षय आणि मोहिनी यांचे संबंध कायम होते. या सर्व प्रकाराची कुणकुण सतिष वाघ यांना लागली होती. 

सतिश वाघ अनैतिक संबंधात ठरत होते अडथळा

पुढे वाघ आणि जावळकर कुटुंबात वाद चालू झाले. त्यामुळे जावळकर कुटुंबाने वाघ दाम्पत्याची खोली सोडली. ते काही अंतरावर असलेल्या दुसऱ्या भाड्याच्या खोलीत राहू लागले.  मात्र तरीदेखील  अक्षय जावळकर आणि मोहिनी वाघ यांच्यात अनैतिक संबंध चालू राहिले. मोहिनी वाघ यांना नवरा सतिश वाघ यांच्याकडचे आर्थिक व्यवहार स्वत:कडे घ्यायचे होते. सोबतच सतिष वाघ अनैतिक संबंधाला अडथळा ठरत होते. त्यामुळेच मोहिनी वाघ यांनी अक्षय जावळकरला सांगून सतिश वाघ यांचा काटा काढण्याचे ठरवले. 

9 डिसेंबर रोजी अपहरण आणि हत्या

पुढे मोहिनी वाघ, अक्षय जावळकर आणि जावळकरच्या मित्रांनी मिळून सतिश वाघ यांच्या हत्येचा कट रचण्यात आला. त्यानंतर 9 डिसेंबर रोजी सतिश वाघ यांचे अपहरण करण्यात आले आणि अवघ्या 15 मिनिटांत त्यांची हत्या करण्यात आली.  या सर्व प्रकरणामुळे पुणे शहर हादरून गेले आहे.

हेही वाचा :

Satish Wagh Case : 48 वर्षांच्या मोहिनी वाघ यांचं 32 वर्षांच्या इंजिनिअरसोबत अफेअर, भाड्याच्या खोलीत अनैतिक संबंधांना अंकुर फुटला

Pune Crime News: पुण्यातील खळबळजनक घटना, बेपत्ता चिमुकल्या बहिणींचे मृतदेह ड्रममध्ये सापडले, शवाची अवस्था पाहून अत्याचाराचा संशय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satish Wagh: सतीश वाघांची बायकोला मारहाण, सूडाची आग मनात धुमसत असलेल्या अक्षय जावळकरने 70 वार केले अन् पोलिसांना क्लू मिळाला
अक्षयच्या मनात सतीश वाघांविरोधात सुडाग्नी का पेटला होता; पोलिसांना क्लू कसा मिळाला?
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी 15 दिवसांनंतरही मोकाट! वाल्मिक कराडच्या पवनचक्की खंडणी प्रकरणाचं काय झालं?
संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी 15 दिवसांनंतरही मोकाट! वाल्मिक कराडच्या पवनचक्की खंडणी प्रकरणाचं काय झालं?
Nashik Crime : संतापजनक... चिमुकल्याकडून दुकानातील वस्तू खाली पडली,  दुकानदाराने आठ वर्षांच्या मुलाला अंगावर वळ उठेपर्यंत मारलं, नाशिकमधील घटना
संतापजनक... चिमुकल्याकडून दुकानातील वस्तू खाली पडली, दुकानदाराने आठ वर्षांच्या मुलाला अंगावर वळ उठेपर्यंत मारलं, नाशिकमधील घटना
Pankaja Munde on Santosh Deshmukh : संतोष देशमुख माझाच बूथप्रमुख, SIT ची मागणी मीच केली, लेकराला न्याय मिळेल, पंकजा मुंडेंची हमी
संतोष देशमुख माझाच बूथप्रमुख, SIT ची मागणी मीच केली, लेकराला न्याय मिळेल, पंकजा मुंडेंची हमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Crime: 48 वर्षीय मोहिनी वाघ, मुलाच्या मित्रासोबत अनैतिक संबंध, Satish Wagh case ची A टू Z कहाणीSanjay Raut Full PC : बहिणींचं कुंकू पुसणाऱ्या अर्बन नक्षलवाद्यांना भाजपचं संरक्षण- संजय राऊतTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM :26 डिसेंबर 2024 : ABP MajhaKalyan Crime Case :  आरोपी विशालचा ताबा कल्याण कोळशेवाडी पोलीसांकडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satish Wagh: सतीश वाघांची बायकोला मारहाण, सूडाची आग मनात धुमसत असलेल्या अक्षय जावळकरने 70 वार केले अन् पोलिसांना क्लू मिळाला
अक्षयच्या मनात सतीश वाघांविरोधात सुडाग्नी का पेटला होता; पोलिसांना क्लू कसा मिळाला?
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी 15 दिवसांनंतरही मोकाट! वाल्मिक कराडच्या पवनचक्की खंडणी प्रकरणाचं काय झालं?
संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी 15 दिवसांनंतरही मोकाट! वाल्मिक कराडच्या पवनचक्की खंडणी प्रकरणाचं काय झालं?
Nashik Crime : संतापजनक... चिमुकल्याकडून दुकानातील वस्तू खाली पडली,  दुकानदाराने आठ वर्षांच्या मुलाला अंगावर वळ उठेपर्यंत मारलं, नाशिकमधील घटना
संतापजनक... चिमुकल्याकडून दुकानातील वस्तू खाली पडली, दुकानदाराने आठ वर्षांच्या मुलाला अंगावर वळ उठेपर्यंत मारलं, नाशिकमधील घटना
Pankaja Munde on Santosh Deshmukh : संतोष देशमुख माझाच बूथप्रमुख, SIT ची मागणी मीच केली, लेकराला न्याय मिळेल, पंकजा मुंडेंची हमी
संतोष देशमुख माझाच बूथप्रमुख, SIT ची मागणी मीच केली, लेकराला न्याय मिळेल, पंकजा मुंडेंची हमी
Sanjay Raut : बीड हत्याकांडाचा सूत्रधार तुमच्या मंत्रिमंडळात, देवेंद्र फडणवीसांना लाज वाटते का? संजय राऊत कडाडले
बीड हत्याकांडाचा सूत्रधार तुमच्या मंत्रिमंडळात, देवेंद्र फडणवीसांना लाज वाटते का? संजय राऊत कडाडले
Pandharpur News: पंढरपुरमध्ये पकडलेल्या दारू साठ्याबाबत पोलीस अन् राज्य उत्पादन शुल्क आमने-सामने; नेमकं काय घडलं?
पंढरपुरमध्ये पकडलेल्या दारू साठ्याबाबत पोलीस अन् राज्य उत्पादन शुल्क आमने-सामने; नेमकं काय घडलं?
Ambernath Crime: शिंदे गटाच्या आमदाराला संपवण्यासाठी सुपारी, शार्प शुटर्स 26 डिसेंबरला लातूरमध्ये हल्ल्याच्या तयारीत होते, पण....
शिंदे गटाच्या आमदाराला संपवण्यासाठी सुपारी, शार्प शुटर्स 26 डिसेंबरला हल्ल्याच्या तयारीत होते, पण....
Mukesh Ambani Stock: मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचं वर्चस्व संकटात, टाटा ग्रुपची 'ही' कंपनी जवळ पोहोचली, पहिलं स्थान हातून निसटणार?
टाटा ग्रुपची कंपनी मुकेश अंबानींना धक्का देणार,रिलायन्स इंडस्ट्रीजचं वर्चस्व संकटात, बाजारात नेमकं काय घडतंय? 
Embed widget