एक्स्प्लोर

पुण्यातील बिबटे गुजराती होणार, जुन्नरमधून दहा बिबट्यांचे अखेर गुजरातला स्थलांतर

Pune : जुन्नर तालुक्यात (Junnar Taluka) बिबट्यांच्या हल्ल्याची समस्या अत्यंत गंभीर व ज्वलंत बनल्यामुळे जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात जेरबंद करण्यात आलेले 10 बिबटे  जामनगर (गुजरात) येथील निवारा केंद्रात आज पाठविण्यात आले असल्याचे जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते (Amol Satpute)  यांनी सांगितले.

Pune : जुन्नर तालुक्यात (Junnar Taluka) बिबट्यांच्या हल्ल्याची समस्या अत्यंत गंभीर व ज्वलंत बनल्यामुळे जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात जेरबंद करण्यात आलेले 10 बिबटे  जामनगर (गुजरात) येथील निवारा केंद्रात आज पाठविण्यात आले असल्याचे जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते (Amol Satpute)  यांनी सांगितले. जगातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय आणि प्राणी पुनर्वसन केंद्र असलेल्या जामनगरमधील 'वनतारा प्राणीसंग्रहालया'त जुन्नर तालुक्यातील (Junnar Taluka) माणिकडोह येथून 4 मादी व 6 नर असे एकूण 10 बिबटे स्थलांतरित करण्यास केंद्रीय प्रणिसंग्रहालय प्राधिकरण दिल्ली (Delhi) यांनी मान्यता दिली होती.

बिबटे गुजरातमधून आणलेल्या पिंजऱ्यात दिवसभरात चढवण्यात  आले

हे बिबटे तीन महाकाय वातानुकूलित ॲंम्ब्युलन्स मधून नेण्यात येत असून एका वातानुकूलित ॲंम्ब्युलन्स मध्ये 5 बिबटे  नेण्याची क्षमता असून दोन ॲंम्ब्युलन्समध्ये 10 बिबटे तर एक ॲंम्ब्युलन्स ही अतिताडीच्या मदतीसाठी सोबत असणार आहे. जुन्नर (Junnar) तालुक्यातील माणिकडोह येथे या तीन ॲंम्ब्युलन्स आज सकाळी पोहचल्या. सोबत गुजरात येथील झु मॅनेजर, पशुवैद्यकीय अधिकारी व 23 मॅनेजमेंट टीमचे सदस्य पोहचले व माणिकडोह व वनविभाग जुन्नर चे 15 अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने आज लगेचच दिवसभरात 10 बिबटे गुजरातमधून आणलेल्या पिंजऱ्यात दिवसभरात चढवण्यात  आले. अमोल सातपुते उपवनसंरक्षक जुन्नर, अमित भिसे, सहायक वनसंरक्षक जुन्नर, प्रदीप चव्हाण, वनपरीक्षेत्र अधिकारी जुन्नर व माणिकडोह पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत हे 10 बिबटे पिंजऱ्यात सुरक्षित दखल घेऊन सोडण्यात आले.

अधिकाऱ्यांसह 20 ते 25 जणांचे गुजरातचे पथक अॅम्ब्युलन्ससोबत असणार

आज  या बिबट्यांची पाठवणी करण्यात आली आहे. बिबट्यांना घेऊन जाण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह 20 ते 25 जणांचे गुजरातचे पथक अॅम्ब्युलन्ससोबत असणार आहे. हायड्रॉलिक पद्धतीने दरवाजे उचलण्याची सोय या महाकाय अॅम्ब्युलन्समध्ये असल्याने हे सर्व बिबट सुरक्षित पणे ॲंम्ब्युलन्समध्ये चढवले गेले. जुन्नर ते जामनगर हा प्रवास लांबचा असल्याने अॅम्ब्युलन्समध्ये बिघाड झाल्यास वा अन्य समस्या उद्भवल्यास 'ब्रेकडाउन व्हॅन' ही दिमतीला देण्यात आली आहे. पाठवणी करण्यात येणाऱ्या बिबट्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना अॅम्ब्युलन्समध्ये दाखल केले गेले. त्यानंतर ही वाहने जामनगरकडे रवाना करण्यात आल्याचे उपवनसंरक्षक जुन्नर यांनी सांगितले. जुन्नर वन विभागाने येथील मानव -बिबट संघर्ष हाताळण्यासाठी उचललेले हे महत्वपूर्ण पाऊल आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

BJP on Uddhav Thackeray : एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन, ठाकरेंचा वार; भाजपकडून देवेंद्र फडणवीसांच्या व्हिडिओने प्रहार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Embed widget