एक्स्प्लोर

PMPML Strike : पुणेकरांच्या प्रवासाची काळजी मिटली!  PMPMLचा संप मागे; सर्व बसेस रस्त्यावर

पुणे महानगर परिवहन (PMPML Strike ) महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) च्या चार कंत्राटदारांचा दोन दिवसीय संप सोमवारी रात्री 66 कोटी रुपयांची थकबाकी मिळाल्याने संपला आहे.

PMPML Strike :  पुणे महानगर परिवहन (PMPML Strike ) महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) च्या चार कंत्राटदारांचा दोन दिवसीय संप सोमवारी रात्री 66 कोटी रुपयांची थकबाकी मिळाल्याने मागे घेतला आहे. या संपामुळे प्रवासी सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे सुमारे आठ लाख प्रवाशांवर परिणाम झाला होता. उर्वरित रक्कमही लवकरच दिली जाणार असून, पीएमपीएमएलची बससेवा आजपासून पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. संप संपल्याने गैरसोय झालेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. बिल न भरल्याने चार कंत्राटदार संपावर गेले होते. सोमवारी 66 कोटी रुपये देण्यात  आले. त्यामुळे बस सेवा पुन्हा सुरू झाली आहे,”पीएमपीएमएल, पुणेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी सांगितलं आहे.

चार महिन्यांपासून 99 कोटी रुपयांच्या थकीत बिलांमुळे रविवारी दुपारी कंत्राटदार संपावर गेले होते. त्यामुळे पीएमपीएमएलच्या 907 बसेसची सेवा विस्कळीत झाली होती. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सोमवारी पीएमपीएमएल प्रशासनाला 90 कोटी रुपये दिले, त्यापैकी 54 कोटी रुपये पुणे महापालिकेकडून (पीएमसी) आणि 36 कोटी रुपये पिंपरी चिंचवड महापालिकेकडून (पीसीएमसी) आले. या रकमेपैकी 66 कोटी रुपये कंत्राटदारांना देण्यात आले तर 24 कोटी रुपये एमएनजीएलला देण्यात येणार आहेत. नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांची बिले सोमवारी मंजूर झाली. ऑलेक्ट्रा, ट्रॅव्हल टाइम, अँथनी आणि हंसा हे चार कंत्राटदार संपात सहभागी झाले होते.

राजकीय लोकांनी घेतली होती बकोरियांची भेट

सोमवारी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख आणि संतोष नांगरे यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पीएमपीएमएलचे सीएमडी बकोरिया यांची  भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी निवेदनही दिलं होतं. त्यानंतर बकोरिया यांनी थकबाकी देऊन बससेवा पुर्ववत करण्याचे आदेश दिले.  त्यानुसार पुण्यात बससेवा सुरु करण्यात आली आहे. होळीच्या दिवशी बससेवा सुरु केल्याने पुणेकरांचा नाहक त्रास कमी झाला आहे.

पुणेकरांच्या प्रश्नासाठी भाजप-कॉंग्रेस एकत्र

बससेवा बंद किंवा संपामुळे भाजप कॉंग्रेस पहिल्यांदाच एकत्र आल्याचं दिसून आलं आहे. दोन्ही पक्षाचे नेते म्हणजेच भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकर हे एकाच वेळी पीएमपीएमएलच्या कार्यलयात आल्याचं दिसलं. त्यामुळे पुणेकरांच्या प्रश्नांना दोन्ही पक्षाकडून पहिलं प्राधान्य दिल्याचं या निमित्ताने बघायला मिळालं आणि पुणेकरांच्या प्रश्नांसाठी एकत्र आल्याचंही दिसलं. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Embed widget