एक्स्प्लोर

Pune Accident News: पुण्यातील धनिकपुत्राची आणखी एक पळवाट बंद, पोर्शे कारमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचे स्पष्ट

Porsche Car Accident : बिल्डरपुत्राने ठोकलेल्या पोर्शे गाडीची तपासणीसाठी पोर्शे कंपनीची टीम पुण्यात दाखल झाली होती. पोर्शे कंपनीच्या प्रतिनिधींनी गाडीची तपासणी केल्यानंतर  मोठी अपडेट समोर आली आहे. 

पुणे : पुणे पोर्शे कार (Pune Porsche Accident) अपघाताचे पुरावे गोळा करण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे.  अपघात झालेल्या गाडी मध्ये कुठलाही तांत्रिक बिघाड नव्हता, पोर्शे (Porsche)  कंपनीने  केलेल्या अधिकृत तपासणीच्या अहवालातून माहिती स्पष्ट झाली आहे. कंपनीकडून या संदर्भातील अधिकृत अहवाल पोलिसांना सुपूर्द  करण्यात आला आहे.  बिल्डरपुत्राने ठोकलेल्या पोर्शे गाडीची तपासणीसाठी पोर्शे कंपनीची टीम पुण्यात दाखल झाली होती. पोर्शे कंपनीच्या प्रतिनिधींनी गाडीची तपासणी केल्यानंतर  ही माहिती समोर आली आहे. 

पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडलं. एकीकडे अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्न होत  होते. पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल यांच्या वकिलांकडून गाडीमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचं आरोप करण्यात येत होता. त्यानंतर  पोलिसांनी थेट पोर्शे कार कंपनीच्या अधिकृत पथकाला बोलावले आणि त्यांच्याकडून गाडीची तपासणी करण्यात आली.  पोर्शे कार कंपनीच्या मुंबई सेंटरहून प्रतिनिधी  आले होते. त्यानंतर त्यांनी गाडीमध्ये कुठलाही तांत्रिक बिघाड नसल्याचा अहवाल  दिला. त्यामुळे मुलाला वाचवण्यासाठी वकिलांनी काढलेली आणखी एक पळवाट बंद झाली आहे.

पोर्श गाडीमधील सीसीटिव्ही तपासण्यात आला

पोर्श गाडीमधील लावण्यात आलेला सीसीटिव्ही सुद्धा तपासण्यात आला. काही दिवसांपूर्वी कंपनीच्या प्रतिनिधींनी येरवडा पोलीस ठाण्यात जाऊन गाडीची तपासणी केली होती .  गाडीमध्ये तांत्रिक बिघाड असल्याची तक्रार अल्पवयीन तरुणाच्या कुटुंबीयांनी केली होती. ही गाडी ऑटोमॅटीक आहे. तपासणीनंतर आम्ही याबाबत अधिक माहिती देऊ शकू, अशी प्रतिनिधींनी प्रतिक्रिया दिली आहे. 

अग्रवाल कुटुंबच आरोपीच्या पिंजऱ्यात 

पोर्शे कार अपघात प्रकऱणी अग्रवाल कुटुंबच आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. आरोपी अल्पवयीन मुलगा, वडील, आई आणि आजोबा अटकेत आहेत. अल्पवयीन मुलगा सध्या बालसुधारगृहात आहे. त्याला पाच जूनपर्यंत सुधारगृहात ठेवण्याचा आदेश देण्यात आलाय. गुन्हात मुलागेच वडील, आई आणि आजोबा अटकेत आहेत. अपघातानंतर चालकाच्या अपहरणाचा कट केल्याप्रकरणी विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक कऱण्यात आली आहे. दोघांनाही न्यायालयीन कोठडी आहे.  शिवानी अग्रवाल यांना पाच जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा :

Pune Porsche Accident : अपघाताच्या रात्री दारु प्यायलो होतो, अल्पवयीन मुलाची कबुली? मित्रांना पोलिस करणार साक्षीदार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 02 PM : 14 March 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सGunaratna Sadavarte Holi : रंग लावले, पप्पीचा प्रयत्न, सदावर्ते कपलची हटके होळी, FULL VIDEORaj Thackeray Holi : राज ठाकरेंची धुळवड,'शिवतीर्थ'वर ठाकरे कुटुंब रंगलं FULL VIDEOABP Majha Headlines : 01 PM : 14 March 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
बँक कर्मचाऱ्यांचा खातेदारांच्या पैशांवर डल्ला, ग्राहकांची वणवण!
बँक कर्मचाऱ्यांचा खातेदारांच्या पैशांवर डल्ला, ग्राहकांची वणवण!
Indian Railway : भारतातील एकमेव पठ्ठ्या, ज्याच्याकडे स्वत:ची ट्रेन, रेल्वेच्या चुकीने बनला होता संपूर्ण ट्रेनचा मालक!
भारतातील एकमेव पठ्ठ्या, ज्याच्याकडे स्वत:ची ट्रेन, रेल्वेच्या चुकीने बनला होता संपूर्ण ट्रेनचा मालक!
Vadodara Car Accident: 100 च्या स्पीडने कार ठोकली, एकाचा जीव घेतला, धनिकपुत्र अपघातानंतर  पुटपुटत राहिला;  ओम नम: शिवाय, अनदर राऊंड निकिता
100 च्या स्पीडने कार ठोकली, एकाचा जीव घेतला, धनिकपुत्र अपघातानंतर पुटपुटत राहिला; 'ओम नम: शिवाय', 'अनदर राऊंड निकिता'
Embed widget