Pune Porsche Car Accident : लेकाला वाचवण्यासाठी बापाची धडपड; फोन लपवले, सीसीटीव्हीत छेडछाड, पुत्राचे कारनामे लपवण्यासाठी विशाल अग्रवालने काय काय केलं?
पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहे. त्यात लेकाला वाचवण्यासाठी बापाकडून आणि आजोबांकडून मोठे प्रयत्न केले जात असल्याचं समोर आलं आहे.
पुणे : पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात रोज नवनवे खुलासे (Pune Porsche Car Accident) होत आहे. त्यात लेकाला वाचवण्यासाठी बापाकडून आणि आजोबांकडून मोठे प्रयत्न केले जात असल्याचं समोर आलं आहे. लेकाला वाचवण्यासाठी पोलिसांना मॅनेज केल आणि पैशाच्या व्यवहार झाल्याचा आरोप केला गेला. त्यात आता विशाल अग्रवालने आपल्या घराचे सीसीटीव्हीतदेखील छेडछाड करण्यात आल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलं आहे. त्यामुळे लेकाला वाचवण्यासाठी विशाल हे कोणत्याही थराला जाऊ शकतात, अशी शंका व्यक्त होत आहे. विशाल अग्रवालसह सहा जणांना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
विशाल अग्रवाल यांने पहिल्यादिवसांपासून मुलाला वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न केले. त्याला 15 तासात जामीन मिळवून दिला मात्र त्यानंतर संतापाची लाट उसळली आणि त्याला पुन्हा एकदा बाल हक्क मंडळात हजर करण्यात आलं त्यानंतर बिल्डरपुत्राची रवानगी थेट बाल सुधार गृहात करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सहाही आरोपींची आज पोलीस कोठडी संपली आणि त्यांना कोर्टा हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी विशाल अगरवालच्या घरातील सीसीटीव्ही जप्त केले मात्र त्याच्याशी छेडछाड करण्यात आली, असल्याचं सरकारी वकिलांनी युक्तीवाद करताना सांगितलं. अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या सोबतच्या दोन मुलांनी दारू सोबत आणखी कोणत्या गोष्टींचे सेवन केलीये का याचा तपास करण्याची गरज असल्याचंदेखील वकिलांनी म्हटलं आहे.
त्यासोबतच विशाल अग्रवाल याने पोलिसांकडून काही माहिती लपवली आणि काही खोटी माहिती दिल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर अल्पवयीन मुलाने 48 हजार रुपयांचे बिल भरले त्याचे बेंक अकाउंटचे डिटेल्स आरोपींकडून देण्यात आलेले नसल्याचंदेखील सरकारी वकिलांनी युक्तीवादात सांगितलं. त्यासोबत आर टी ओ कडे वाहनाची नोंद पुर्ण न करता कार वापरण्यात आली. ही कार नोंदणी केली असल्याचं खोटं पोलिसांना सांगितलं होतं. त्यामुळे विशाल अग्रवालवर पुन्हा दोन कलमं वाढवण्यात आली आहे. यामुळे विशाल अग्रवालच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
त्यासोबतच ड्रायव्हरलादेखील त्याने खोटं बोलायला सांगितल असल्याचं ड्रायव्हरने जाबाबत सांगितलं आहे. मी गाडी चालवत नव्हते बिल्डरचा पुत्र गाडी चालवत होता. मात्र मी गाडी चालवत होतो, असं मला विशाल अग्रवालने खोटं सांगायला लावल्याचं ड्रायव्हरने सांगितलं आणि यामुळे विशाल अग्रवाल पुन्हा गोत्यात आला. त्यानंतर विशाल अग्रवालने आपले फोनदेखील लपवले होते. ते फोन पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. हे फोन फॉरेन्सिककडे पाठवण्यात आले आहेत. या फोनमधून त्या रात्री कोणाशी कोणता संवाद झाला होता. हे समोर येणार आहे.