एक्स्प्लोर

Pune Car Accident: कुलदीपकाला वाचवायला अग्रवाल बाप-बेट्यानं ड्रायव्हरला खोलीत डांबलं, पण बायकोच्या आरडाओरड्यामुळे अग्रवालांच्या तावडीतून सुटला

Pune News: ड्रायव्हरने कंपनीचे कपडे घातले होते. कंपनीच्या नावाचा युनिफॉर्म होता. विशाल अग्रवाल आणि सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी त्याला हे कपडे घरीच काढून जायला सांगितले, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.

पुणे: गेल्या आठडाभरात पुण्यातील अपघात प्रकरणात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. पोर्शे कारखाली दोघांना चिरडणाऱ्या (Pune Porsche Car Accident)अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी पुण्यातील धनाढ्य अग्रवाल कुटुंबाकडून शक्य त्या सर्व मार्गांचा अवलंब केला जात आहे. याच अग्रवाल कुटुंबातील विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) आणि सुरेंद्रकुमार अग्रवाल (Surendra Agrawal) यांनी याप्रकरणात चालकावर खोटी जबानी देण्यासाठी दबाव आणल्याची माहिती समोर आली आहे. गंगाराम पुजारी (Gangaram Pujari) असे या चालकाचे नाव असून त्याने पोलिसांना सगळा प्रकार सांगितला आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. 

पोलीस आयुक्तांनी आपल्या पत्रकार परिषदेत अग्रवाल कुटुंबीयांनी त्यांच्या चालकाला कसे धमकावले, याबाबतचा सविस्तर तपशील सांगितला. चालक आपल्या घरी जात असताना सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी त्याला आपल्या गाडीत बसवून घरी नेले. त्यानंतर आरोपींनी गंगाराम पुजारी याच्याकडून त्याचा मोबाईल काढून घेतला आणि त्याला घरातील एका खोलीत डांबून ठेवले. तू कुठेही जायचे नाही, कोणाशीही बोलायचे नाही. आम्ही सांगतो तोच जबाब पोलिसांना द्यायचा, असा दबाव अग्रवाल बाप-बेट्यांनी चालकावर आणला. तू हा गुन्हा तुझ्या अंगावर घे आम्ही तुला गिफ्ट देऊ, असे सांगून अग्रवाल यांनी गंगाराम पुजारीला आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला. हे सांगूनही तो ऐकायला तयार नव्हता तेव्हा अग्रवाल बाप-बेट्यांनी चालकाला धमकावले. आम्ही तुला बघून घेऊ, अशी धमकी दिली, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.

बायकोच्या आरडाओरड्यामुळे अग्रवालांच्या तावडीतून सुटला

विशाल अग्रवाल आणि सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी चालक गंगारामला आपल्या घरात डांबून ठेवले होते. त्याचा मोबाईल फोन काढून घेतल्यामुळे घरच्यांशी संपर्क होऊ शकला नव्हता. आपला नवरा घरी आला नाही म्हणून दुसऱ्या दिवशी गंगाराम पुजारीची बायको नातेवाईकांना घेऊन अग्रवाल कुटुंबीयांच्या घरी पोहोचली. अग्रवाल कुटुंबीयांनी गंगारामला सोडण्यास नकार दिला तेव्हा त्याच्या पत्नीने आरडाओरडा केला. त्यामुळे अग्रवाल कुटुंबाने गंगारामला सोडले. अग्रवाल यांच्या घरातून पत्नीसह बाहेर पडल्यानंतर गंगाराम घाबरला होता. पण पोलिसांनी परवा त्याचा जबाब नोंदवून घेतला. काल  त्याची प्राथमिक चौकशी करुन आम्ही सुरेंद्रकुमार अग्रवाल यांच्यावर कलम 342, कलम 365 आणि कलम 368 अंतर्गत अपहरण, दमदाटी आणि डांबून ठेवण्याचा गु्न्हा दाखल केला. यानंतर सुरेंद्र अग्रवालला अटक केली असून त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले जाईल. विशाल अग्रवाल न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे त्याला आवश्यक ती प्रक्रिया करुन ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.

पुणे अपघात प्रकरणाचा तपास शुक्रवारी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. गुन्हे शाखेच्या पथकाने ड्रायव्हरसह अग्रवाल यांच्या घरी जाऊन पंचनामा केला. ड्रायव्हरला ज्या खोलीत डांबण्यात आले होते, त्यावेळी ड्रायव्हरने जे कपडे घातले होते, ते ताब्यात घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली. 

मी गाडी चालवत नव्हतो, ड्रायव्हरची स्पष्टोक्ती

अपघात झाला त्यावेळी पोर्शे कार माझा मुलगा नव्हे तर ड्रायव्हर चालवत होता, असा दावा विशाल अग्रवाल यांनी न्यायालयात केला होता. मात्र, अपघाताच्या वेळी गाडी विशाल अग्रवाल यांचा मुलगाच चालवत होता, अशी कबुली ड्रायव्हरने दिली. माझी या सगळ्या कोणतीही चूक नाही. अग्रवाल यांनी आमिष दाखवून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मी सुरुवातीला दबावात घाबरुन जाऊन जबाब दिला. ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात आली. मी घाबरलो होतो, असे ड्रायव्हरने पोलिसांना सांगितले. अग्रवाल कुटुंबीयांनी आपल्याला जबरदस्तीने खोलीत डांबून ठेवले, याचा ड्रायव्हर गंगाराम पुजारीला मोठा मानसिक धक्का बसल्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. 

आणखी वाचा

विशाल अग्रवालांचा वकील शरद पवारांचा, नितेश राणेंचा आरोप, अजितदादांनी झाप झाप झापलं, VIDEO

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एका षटकात 43 धावा, इंग्लंडच्या गोलंदाजाची धुलाई, 134 वर्षातील सर्वात खराब ओव्हर
एका षटकात 43 धावा, इंग्लंडच्या गोलंदाजाची धुलाई, 134 वर्षातील सर्वात खराब ओव्हर
हिरवा निसर्ग हा भोवतीने, 'राऊतवाडी धबधब्याची सफर' करा मस्तीने; पाणी प्रवाही झाल्याने पर्यटकांची गर्दी
हिरवा निसर्ग हा भोवतीने, 'राऊतवाडी धबधब्याची सफर' करा मस्तीने; पाणी प्रवाही झाल्याने पर्यटकांची गर्दी
Vanchit Bahujan Aghadi : विधानसभा निवडणुकीत वंचित पूर्ण ताकदीने उतरणार; महायुती, महाविकास आघाडीचे पुन्हा टेन्शन वाढवणार?
विधानसभा निवडणुकीत वंचित पूर्ण ताकदीने उतरणार; महायुती, महाविकास आघाडीचे पुन्हा टेन्शन वाढवणार?
सेमीफायनलआधी सूर्याला मोठा धक्का, टी20 तं अव्वल स्थान गेलं! 
सेमीफायनलआधी सूर्याला मोठा धक्का, टी20 तं अव्वल स्थान गेलं! 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Zika Virus : पुण्यात झिका व्हायरसचे दोन रुग्ण, गरोदर महिलांना व्हायरसचा धोका अधिकVijay Wadettiwar : मराठीच्या मुद्द्यावर मविआ विधानसभा लढवणार? वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य!Kolhapur Radhanagri Dam : राधानगरी धरण परिसरात रिमझिम पाऊस, पर्यटकांनी केली गर्दीABP Majha Headlines : 06 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एका षटकात 43 धावा, इंग्लंडच्या गोलंदाजाची धुलाई, 134 वर्षातील सर्वात खराब ओव्हर
एका षटकात 43 धावा, इंग्लंडच्या गोलंदाजाची धुलाई, 134 वर्षातील सर्वात खराब ओव्हर
हिरवा निसर्ग हा भोवतीने, 'राऊतवाडी धबधब्याची सफर' करा मस्तीने; पाणी प्रवाही झाल्याने पर्यटकांची गर्दी
हिरवा निसर्ग हा भोवतीने, 'राऊतवाडी धबधब्याची सफर' करा मस्तीने; पाणी प्रवाही झाल्याने पर्यटकांची गर्दी
Vanchit Bahujan Aghadi : विधानसभा निवडणुकीत वंचित पूर्ण ताकदीने उतरणार; महायुती, महाविकास आघाडीचे पुन्हा टेन्शन वाढवणार?
विधानसभा निवडणुकीत वंचित पूर्ण ताकदीने उतरणार; महायुती, महाविकास आघाडीचे पुन्हा टेन्शन वाढवणार?
सेमीफायनलआधी सूर्याला मोठा धक्का, टी20 तं अव्वल स्थान गेलं! 
सेमीफायनलआधी सूर्याला मोठा धक्का, टी20 तं अव्वल स्थान गेलं! 
Pune News : अल्पवयीन मुलांचे नको ते प्रताप, पालकांनी उचलले मोठं पाऊल;  लेकरांच्या मागे लावले चक्क 'डिटेक्टिव्ह'
अल्पवयीन मुलांचे नको ते प्रताप, पालकांनी उचलले मोठं पाऊल; लेकरांच्या मागे लावले चक्क 'डिटेक्टिव्ह'
IND vs ENG : इंग्लंडचा 'हा' गोलंदाज ठरतोय डोकेदुखी, 2022 सेमीफायनलमध्ये विराट-रोहित-हार्दिकला केलेय बाद 
IND vs ENG : इंग्लंडचा 'हा' गोलंदाज ठरतोय डोकेदुखी, 2022 सेमीफायनलमध्ये विराट-रोहित-हार्दिकला केलेय बाद 
निवडणुकीला गालबोट, मतदान केंद्राबाहेर पैशाच्या पाकिटांसह एकास पकडलं; ठाकरेंचे कार्यकर्ते संतप्त
निवडणुकीला गालबोट, मतदान केंद्राबाहेर पैशाच्या पाकिटांसह एकास पकडलं; ठाकरेंचे कार्यकर्ते संतप्त
Wardha Crime News : अवैध दारू विक्रीसाठी चक्क देवघराचा वापर! जिल्ह्यात दारूबंदी असताना नवनवीन शक्कल
अवैध दारू विक्रीसाठी चक्क देवघराचा वापर! जिल्ह्यात दारूबंदी असताना नवनवीन शक्कल
Embed widget