Pune News: मोठी बातमी : पुणे अपघातप्रकरणी देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये, बिल्डर पुत्रावर कठोर कारवाईचे आदेश
देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिस आयुक्तांना फोन करुन आदेश दिले. या प्रकरणातील आरोपीला जामीन मिळाला असला तरी त्याविरुद्ध अपील दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पुणे : पुण्यात (Pune Porsche Car Accident News) प्रसिद्ध व्यावसायिकाच्या मुलानं दोन आयटी अभियंत्यांना आपल्या गाडीखाली चिरडलं. पण ज्यानं अपघात घडवला त्या वेदांत अग्रवालला अवघ्या काही तासात जामीन मिळाला. आरोपी अल्पवयीन असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पुण्यात रात्री-अपरात्री, उशिरापर्यंत सुरु असलेले बार आणि धनाढ्य बापाच्या मुलाचा बेदरकारपणा आज दोघांच्या जिवावर बेतला. या घटनेनंतर प्रचंड संताप व्यक्त होत आहे. आता या प्रकरणाची कठोर चौकशी करण्यचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
या अपघातानंतर स्थानिकांनी विशाल अग्रवाल यांच्या मुलाला पोर्शे गाडीतून बाहेर काढून चोपले होते. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. मात्र, त्यानंतर हा धनिकपुत्र अवघ्या 15 तासांमध्ये जामिनावर बाहेर आला. याबद्दल प्रचंड चीड व्यक्त केली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश दिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिस आयुक्तांना फोन करुन आदेश दिले. या प्रकरणातील आरोपीला जामीन मिळाला असला तरी त्याविरुद्ध अपील दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
विशेष वागणूक दिली असेल तर सीसीटीव्ही तपासा, फडणवीसांचे आदेश
पोलिसांकडून विशाल अग्रवाल यांच्या मुलाला विशेष वागणूक देण्यात आल्याचा आरोप करत आहे. या प्रकरणात आरोपीला कोणती विशेष वागणूक दिली असल्यास, त्यावेळचे पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून ते खरे असेल तर तत्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा, अशाही सूचना देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
दोन पब चालकांवर गुन्हा दाखल
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघाताला संबंधित कारचालक मुलाच्या वडीलांना कारणीभूत ठरवलंय. याप्रकरणी कारचालक मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि त्याला दारु देणाऱ्या दोन पब चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुलगा अल्पवयीन असूनही त्याला कार चालवायला दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर कारवाई करण्यात आलीये. तर मुलाला दारु देणारे हॉटेल काझीचे मालक प्रल्हाद भुतडा आणि मॅनेजर सचिन काटकर त्याचबरोबर हॉटेल ब्लॅकचे संदीप सांगळे आणि बार काऊंटर जयेश बोनकरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
नेमकं काय घडले?
पुण्यातल्या ब्रह्मा कॉर्प या नामांकित बिल्डरचा मुलगा आहे. पुण्यातल्या रस्त्यावर तो मध्यरात्री भरधाव वेगात गाडी चालवत होता. कल्याणीनगर भागात याच भरधाव गाडीनं एका दुचाकीला धडक दिली... ही धडक एवढी जोरदार होती, की या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा असे नाव आहे. हे दोघे आपल्या मित्रांसोबत पार्टी करुन घरी चालले होते. पण वेदांत अग्रवालच्या भरधाव वेगानं त्यांना अक्षरश: चिरडलं. धक्कादायक म्हणजे ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी आरोपीच्या कारला ना पुढे नंबर प्लेट होती ना मागे होती.
Video :
हे ही वाचा :
Pune Porshe Accident News: 200 KMPH वेगाने धावणारी पोर्शे कार, बाईकवरील तरुणाच्या बरगड्यांचा चुरा, प्रत्यक्षदर्शीने सांगितली पुण्यातील अपघाताची आँखो देखी कहाणी