(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Porsche car Accident Live Update : पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरण: मोठी बातमी: विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. विशाल अग्रवालचे वडिल सुरेंद्र अग्रवाल त्यानंतर ड्रायव्हर आणि आता त्याच्यसोबत असणाऱ्या दोन मित्रांचीदेखील चोकशी होणार आहे
LIVE
Background
पुणे : पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. रोज एकेकाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. विशाल अग्रवालचे वडिल सुरेंद्र अग्रवाल त्यानंतर ड्रायव्हर आणि आता त्याच्यसोबत असणाऱ्या दोन मित्रांचीदेखील चोकशी होणार आहे. रविवारी 18 मेला रात्री अडीचच्या सुमारास विशाल अग्रवालच्या मुलाने भरधाव पोर्शे कारने दोघांना उडवलं होतं. यात दोन इंजिनियरचा मृत्यू झाला होता. त्यानंतर १५ तासातच विशाल अग्रवालच्या मुलाला जामीन मंजूर करण्यात आला. या जामीनावरुन संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर त्याला पुन्हा एकदा कोर्टात हरज करुन त्याची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली. याच प्रकरणाची आता सखोल चौकशी करण्यात येत आहे.
उष्माघातमुळे छत्रपती संभाजीनगरमधील शेतकऱ्याचा मृत्यू
संभाजीनगर जिल्ह्यात सोयगाव तालुक्यातील कवली येथे उष्माघात मुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. शेतातून खरीप पूर्व मशागतीची कामे आटोपून दुपारी घरी आलेल्या शेतकऱ्यांला सायंकाळी घाम आल्यामुळे अत्यवस्थ होऊन त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्यास तातडीच्या उपचारासाठी पिंपळगाव येथे हलविण्यात आले होते. पुढील उपचारासाठी पाचोरा येथे घेऊन जात असताना त्यांचा उष्माघातमुळे मृत्यू झाला. प्रकाश भागवत तराल (वय 62) असे उष्माघातमुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे.
विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Pune Porsche car Accident : विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
विशाल अग्रवाल कोर्टात हजर
पुणे ; विशाल अग्रवाल याची पोलीस कोठडी संपली असून त्याला कोर्टात हजर करण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कोर्टाच्या मागच्या दाराने कोर्टात आणलं.
सहा आरोपींची कसून चौकशी सुरु
Pune Porsche car Accident : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यासाठी सहाही आरोपींना काही वेळात काढतील..
क्राइम ब्रांच युनिट 4 च्या कार्यालयात या सहाही आरोपींची चौकशी सुरू होती...
व्हिडीओ फेक आहे : पुणे पोलीस आयुक्त
आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देखील याचा खुलासा केला आहे.अमितश कुमार म्हणाले, व्हिडीओ फेक आहेत. कुणी तयार केलेत ते तपासले आहेत. अल्पवयीन आरोपीने तयार केलेले नाही. या संदर्भात अधिक चौकशी सुरू आहे.