अजित पवार आणि पोलीस आयुक्तांमध्ये काय बोलणं झालं? अंजली दमानियांचा खळबळजनक आरोप, पुणे अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट
पुण्याचे पालकमंत्री अपघाताबद्दल त्यांनी एक शब्द देखील काढला नाही. प्रत्येक वेळी सुनील टिंगरेंचे नाव पुढे येत होते. पण ही सारवासारव नक्की कोणासाठी चालली होती? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केली आहे.

Pune Accident: पुणे रॅश ड्रायव्हिंगप्रकरणी (Pune Porsche Accident) अजित पवारांनी (Ajit Pawar Called Pune CP) पोलिसांना फोन केला होता का? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी पोलिसांना केला आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी दमानियांनी केली आहे. 'फोन केला असेल तर अजित पवारांचा मुख्यमंत्री राजीनामा घेतील का?', असा सवाल दमानिया यांनी केला आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या, मी एक ट्वीट केले होते. त्या ट्वीटमध्ये मी माझ्या मनातील शंका उपस्थित केल्या होत्या. पुण्याच्या भीषण अपघातात दोन जणांचा जीव घेतला. एका श्रीमंताच्या मुलाला वाचवण्यासाठी सर्व पोलीस यंत्रणा काम करत आहे असे काहीसे चित्र होते. त्याच्या मागे कोण होते? अशी शंका माझ्या मनात होती. म्हणून मी ते ट्वीट डीलिट केली. परंतु माझी शंका आता खरी ठरत आहे की काय असे वाटत आहे. मी माध्यमात बातमी पाहिले की, अजित पवारांनी पुण्याच्या आयुक्तांना फोन केला. हीच शंका माझ्या मनात होती. प्रत्येक गोष्टीत बोलणारे अजित पवार पहिले चार दिवस एकही शब्द बोलले नाही. मी सकाळी उठून काम करतो म्हणारे पुण्याचे पालकमंत्री अपघाताबद्दल त्यांनी एक शब्द देखील काढला नाही. प्रत्येक वेळी सुनील टिंगरेंचे नाव पुढे येत होते. पण ही सारवासारव कोणासाठी चालली होती?
पुणे अपघात प्रकरणात अजित पवारांनी CP पुणे यांना फ़ोन केला होता का याचा ताबडतोब खुलासा CP यांनी करावा pic.twitter.com/8jNA4XLKvi
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 27, 2024
अजित पवारांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा : अंजली दमानीया
पुण्याच्या आयुक्तांनी अजित पवारांचा फोन आला होता तर त्यांनी तात्काळ स्पष्टीकरण द्यावे. फोन केला की नाही? फोन केला नसेल तर उत्तम पण केला असेल तर अजित पवारांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा. मु्ख्यमंत्र्यांनी आज अजित पवारांकडे राजीनाम्याची मागणी करावी. फडणवीसांनी सुद्धा अजित पवारांकडे राजीनाम्याची मागणी करावी, अशी मागणी अंजली दमानीया यांनी केली आहे.
सुनील टिंगरे यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप
पुणे अपघात प्रकरणात सुनील टिंगरे यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या विनिता देशमुख यांनी केला होता. त्याानंतर हे प्रकरण दाबण्यात आल्याची चर्चा सुरू झाली. अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. तर सुनिल टिंगरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. अजित पवारांनी पुणे पोलिस आयुक्तांना फोन करून मंगळवारी दुपारी कारवाईचे आदेश दिले. सुनील टिंगरे हे मध्यरात्री येरवडा पोलीस स्टेशनमध्ये होते, त्यांनी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप होत आहे.
हे ही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
