Pune Police : निखिल वागळेंची भररस्त्यात पाठलाग करून गाडी फोडली; पुणे पोलिसांची पहिली मोठी कारवाई
पुण्यामध्ये शुक्रवारी रात्री भाजपने निखिल वागळे यांना विरोध केल्याने भर रस्त्यावर घनघोर संघर्ष पाहायला मिळाला. तब्बल चार ठिकाणी त्यांच्या गाडीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
पुणे : पुण्यामध्ये 'निर्भय बनो' कार्यक्रमासाठी जाताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या भाजपच्या दहा कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. दीपक पोटे ,बापू मानकर, गणेश शेरला ,गणेश घोष, स्वप्निल नाईक प्रतीक देसरडा दुशांत मोहोळ दत्ता सागरे, गिरीश मानकर आणि राहुल पायगुडे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पुण्यामध्ये शुक्रवारी रात्री भाजपने निखिल वागळे यांना विरोध केल्याने भर रस्त्यावर घनघोर संघर्ष पाहायला मिळाला. निखिल वागळे कार्यक्रमस्थळी पोहोचत असताना तब्बल चार ठिकाणी त्यांच्या गाडीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. चार ठिकाणी त्यांची गाडी फोडण्यात आली. हा हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याचा आरोप आयोजकांसह निखिल वागळे यांनी केला होता.
राष्ट्र सेवा दलाच्या बाहेर आंदोलन करणाऱ्या 43 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
निखिल वागळे बसलेल्या गाडीवर दगड, अंडी, शाई असेल मिळेल ते फेकून मारण्यात आले. यानंतरही निर्धाराने निखिल वागळे यांनी कार्यक्रमस्थळी पोहोचले. वागळे यांनी जोरदार भाषण करताना भाजपच्या धमक्यांना किंवा हल्ल्यांना भीक घालत नसल्याची टीका केली. दुससरीकडे निखिल वागळे यांच्यासह सभा आयोजकांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्र सेवा दलाच्या बाहेर आंदोलन करणाऱ्या 43 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कार्यकर्तेच नाही, तर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे.
निखिल वागळे यांनी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न घोषित झाल्यानंतर ट्विट करून पीएम मोदी यांच्यावर टीका केली होती. यानंतर पुण्यात येत असेल्या वागळे यांची सभा उधळून लावण्याचा इशारा भाजपने दिला होता. निखिल वागळेंविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, भाजपकडून महिलांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप महिलांनी केला आहे. आम्ही पोलिसांतची मदत मागत होतो. मात्र, पोलीस मदत करायला तयार नव्हते. भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आमच्या अंगावर धावून आल्याचा आरोपही महिलांकडून करण्यात आला आहे. काही महिलांना जखमा देखील झाल्या आहेत. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून पर्वती पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्याकडून या घटनेची सविस्तर माहिती घेतली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या