एक्स्प्लोर
Advertisement
साडेतीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार, 14 वर्षीय चुलत भाऊ ताब्यात
त्यावेळी सकाळी साडेदहाच्या सुमारास आरोपी मुलगा तिला त्याच्या घरी घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला.
पुणे : शेजारी राहणाऱ्या साडेतीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाप्रकरणी एका 14 वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे. पुण्यातील देहू रोड इथे हा प्रकार घडला. आरोपी मुलगा हा मुलीचा चुलत भाऊ असल्याचं कळतं.
देहू रोड इथे शुक्रवारी (6 एप्रिल) सकाळी हा प्रकार घडला. तक्रारीनुसार, संबंधित मुलगी तिच्या घरासमोर खेळत असताना, नववीत शिकणाऱ्या आरोपी मुलाने तिच्यावर बलात्कार केला.
"शुक्रवारी संबंधित मुलगी तिच्या घरासमोर खेळत होती. त्यावेळी सकाळी साडेदहाच्या सुमारास आरोपी मुलगा तिला त्याच्या घरी घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. मुलीच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर तिची आई मुलाच्या घरात गेली. पण आईला पाहिल्यानंतर मुलाने तिथून पळ काढला," असं देहू रोड पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
मुलीच्या आईने संबंधित प्रकार तिच्या पतीला सांगितला. त्यानंतर शनिवारी त्यांनी पोलिस स्टेशन गाठलं आणि मुलाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलाविरोधात भारतीय दंड विधान कलम 376 (बलात्कार) आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets