एक्स्प्लोर

Pune Pmc News: पुणेकरांनो महापालिकेकडे वाहतुकीचा प्रस्ताव द्या अन् मुलांना सुरक्षित शाळेत पाठवा

पुण्यातील सर्वच भागात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत असताना शालेय वाहतुकीच्या नियोजनाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, त्यामुळे स्पर्धेतून शालेय वाहतूक सुधारण्याचे नियोजनाचा निर्णय पीएमसीने घेतला आहे.

Pune Pmc News: वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे पालक मुलांना सायकलने किंवा पायी चालत शाळेत पाठवण्याचे धाडस करत नाहीत. त्यामुळे ते आपल्या मुलांना स्वतःच्या बाईक किंवा स्कूल बसने किंवा व्हॅनने शाळेत पाठवतात. ही संख्या वाढली की वाहतूक कोंडीही वाढते आणि सुरक्षित प्रवासाची खात्री नसते. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने (PMC) विद्यार्थ्यांसाठी वाहतुकीची व्यवस्था आणि नियोजन करण्यासाठी पावलं उचलली आहेत.

शाळेत प्रवेश आणि बाहेर पडताना विद्यार्थ्यांना प्राधान्य देताना विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे चालता यावं, सायकल चालवता यावी आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करता यावा यासाठी आराखडा तयार केला जाणार आहे.  2018 च्या योजनेनुसार पुण्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये रोज सुमारे दहा लाख विद्यार्थी जातात. यातील 43 टक्के विद्यार्थी पायी चालत शाळेत जातात, तर चार टक्के विद्यार्थी सायकलने शाळेत जातात. घरापासून शाळा दोन ते चार किलोमीटर अंतरावर असली तरी पालक स्वत: विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी जातात किंवा खासगी वाहनाने पाठवतात.

पुण्यातील सर्वच भागात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत असताना शालेय वाहतुकीच्या नियोजनाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, त्यामुळे स्पर्धेच्या माध्यमातून शालेय वाहतूक सुधारण्याचे नियोजन करण्याचा निर्णय पीएमसीने घेतला आहे.

“शहरातील 43 टक्के विद्यार्थी चालत शाळेत जातात, मात्र केवळ चार टक्केच सायकली वापरतात. दुचाकी, टॅक्सी किंवा स्कूल बसने विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचे प्रमाण 37 टक्के आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वाहतुकीचे नियोजन केल्यास त्याचा परिणाम शहरातील संपूर्ण वाहतुकीवर होईल, त्यामुळे नियोजन सुरू आहे. त्यासाठी आराखडा तयार करण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे,” अशी माहिती पीएमसीचे वाहतूक नियोजक निखिल मिझार यांनी दिली.

शहरातील बहुतांश शाळा व महाविद्यालये असलेले क्षेत्र निवडण्यात आले आहेत. त्या प्रत्येक भागाचा विचार करून आराखडा तयार केला जाईल. त्यात डेक्कन जिमखाना, हडपसर, लोहेगाव-धानोरी, कोथरूड, वडगाव बुद्रुक, पार्वती-बिबवेवाडी, पाषाण, कोंढवा आणि खराडी या शहरातील नऊ भागांचा समावेश आहे. या प्रत्येक भागात असलेल्या शैक्षणिक संस्था, तेथून होणारी वाहतूक कोंडी, गर्दीचे तास यांचा अभ्यास करण्यात येणार आहे.

शालेय वाहतूक सुधारण्यासाठी योजना बनवण्यात कोणताही नागरिक सहभागी होऊ शकतो मात्र त्यासाठी शहर नियोजक किंवा शहर रचनाकार असणे बंधनकारक आहे आणि त्यांच्यामार्फत प्रस्ताव सादर करणे बंधनकारक आहे. महापालिका नऊ विभागांपैकी एकाची निवड करून त्याचा सर्वसमावेशक आराखडा सादर करणार आहे. सार्वजनिक वाहतूक आणि शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा हा प्रस्ताव असावा. या प्रस्तावांमधून तीन विजेते निवडले जातील. त्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. हे प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 24 जुलै आहे यासंदर्भातील सर्व माहिती www.pmc.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : मुंबई ते बंगळुरू 5 तासांत तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर 2 तासांत प्रवास, गडकरींचा मास्टर प्लॅन!
मुंबई ते बंगळुरू 5 तासांत तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर 2 तासांत प्रवास, गडकरींचा मास्टर प्लॅन!
Pune Crime News: स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Embed widget