Pune Bypoll election : भाजपचं कोडं सुटलं, मविआचं तिढा कायम, पिंपरीत मविआची उमेदवारी कुणाला मिळणार?
Pune Bypoll election : एकीकडे कसब्यात भाजपमध्येच नाराजी नाट्य सुरु असताना दुसरीकडे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत अद्याप तिढा कायम आहे.
Pune Bypoll election : एकीकडे कसब्यात भाजपमध्येच नाराजी नाट्य सुरु असताना दुसरीकडे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत अद्याप तिढा कायम आहे. त्यामुळेच विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक झाली. कारण, ही जागा कोण लढवणार यावरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे.
मोठं शक्तीप्रदर्शन करत. भाजपनं पिंपरीत पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखलं केले. एक नाही तर दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पण, अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास उरलेत.. तहीरी मविआकडून उमेदवार फायनल होत नाहीय. आणि ही जागा राष्ट्रवादीनं लढवाची...की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं यावरच मविआच घोडं अडलं आहे. 2019ला बंडखोरी करणारे राहुल कलाटे हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम असल्याचं बोललं जातंय. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांनी ही अर्ज भरून तयार ठेवलेत. त्यामुळे चिंचवड विधानसभा शिवसेनेनं की राष्ट्रवादी काँग्रेसनं लढवायची. यावरून महाविकासआघाडीत घमासान सुरू आहे. उद्या दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ हाती असल्यानं भाजपच्या अश्विनी जगतापांसमोर महाविकासआघाडीचा उमेदवार कोण असणार? याबाबतची उत्सुकता आणखी शिगेला पोहचली आहे.
भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. भाजपनं त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनाच उमेदवारी दिली..आणि आज मोठं शक्तीप्रदर्शन करत त्यांचा अर्ज दाखल केला. इतंकच नाही तर अश्विनी जगतापानंतर त्यांचे दिर शंकर जगतापांनी डमी अर्ज भरला आहे. त्यामुळे भाजप नवी खेळी खेळणार का? याबाबत ही चर्चा रंगली आहे. महाविकासआघाडीत चिंचवडची जागा राष्ट्रवादी की शिवसेनेनं लढवायची, हा तिढा सुटेना. तर जगताप कुटुंबातून दोघांचे अर्ज दाखल करून झालेत. त्यामुळं उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत चिंचवड विधानसभेत राजकीय डावपेच पहायला मिळणार हे नक्की.
कसबा, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल
कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार हेमंत रासने आणि श्रीमती अश्विनी जगताप यांनी सोमवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांसह सर्वांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजपा व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विशाल रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन केले. भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, भाजपा पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, शैलेश टिळक, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नाना भानगिरे, प्रदेश सचिव किरण साळी, संपर्क प्रमुख अजय भोसले, रिपब्लिकन पक्षाचे डॉ. सिद्धार्थ धेंडे, शैलेंद्र चव्हाण, मंदार जोशी, शिवसंग्रामचे भारत लगड यांच्यासह भाजपा आणि महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.