PCMC News: प्रशासन आणि नागरीकांमधील संवाद सोपा होणार; पिंपरी-चिंचवड महापालिका प्रत्येक विभागाचं स्वतंत्र ट्विटर खातं उघडणार
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रत्येक विभागाचे आता स्वतंत्र ट्विटर खातंं असणार आहे. मोठ्या प्रमाणात नागरीकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
PCMC News: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) प्रत्येक विभागाचे आता स्वतंत्र ट्विटर खातंं असणार आहे. मोठ्या प्रमाणात नागरीकांपर्यंत पोहोचण्यासाठी, प्रशासनाने आपल्या नागरी कर्मचार्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा योग्य वापर करण्याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जलद माहिती वितरण आणि नागरी संवादासाठी, प्रत्येक महापालिका विभागाकडे ईमेल पत्त्या व्यतिरिक्त स्वतंत्र ट्विटर खातं असेल.
याबाबत महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी शहरातील कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली होती. प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मायक्रोब्लॉगिंग वेबसाइटचा वापर सर्व विभाग प्रमुखांना समजावून सांगण्यात आला. प्रशासकीय कामात विविध माध्यमांचा वापर व्यक्तीशी संवाद साधण्यासाठी आवश्यक आहे. ट्विटरसारख्या माध्यमांचा वापर करून महापालिकेच्या योजना आणि कामकाजाची माहिती जनतेला द्यावी. सोशल मीडियामुळे जलद प्रशासन आणि नागरीकांचा थेट संवाद शक्य झाला आहे. यामुळे अनेकांशी योग्य संबंध जोडण्यात यश मिळेल. हे नागरी संस्थेबद्दल चांगले समज वाढविण्यात मदत करेल, असं पाटील म्हणाले.
या माध्यमाचा वापर जागतिक स्तरावर विस्तारत आहे. हे वापरण्यास सोपे, नाजूक माध्यम आहे. महापालिका आयुक्त आणि नागरी संस्था या दोघांची ट्विटर खाती आहेत. सर्व नागरी विभागांची वेगवेगळी ट्विटर खाती असतील. विशिष्ट विभागाची चौकशी तेथे केली जाऊ शकते. नागरिकांसाठी, हे नोकरशाही प्रक्रिया सुलभ करेल, अशी माहिती PCMC चे जनसंपर्क प्रतिनिधी किरण गायकवाड यांनी दिली आहे. ट्वीटरवर दररोज 100 हून अधिक नागरीक सहभागी होतात आणि कल्पना, तक्रारी आणि मते स्पष्टपणे मांडतात. यामुळे या तक्रारींचं निवारण करणं सोपं होतं, असंही ते म्हणाले.
सध्या सगळे अनेक विभागाची नोंदणी किंवा कागदपत्रे ऑनलाईन काढण्यास प्राधान्य देतात. नागरीक आणि प्रशासनामध्ये पारदर्शकता रहावी यासाठी सोशल मीडियाचा उत्तम वापर केला जातो. महापालिकेच्या विविध विभागांची स्वतंत्र माहिती मिळावी आणि नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी स्वतंत्र ट्वीटर खातं सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे संवाद सोपा होईल आणि समस्यांचं निवारण करणं सोपं होणार आहे.