(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune News : चाकणमध्ये 18 वर्षीय तरुणीचा गळा आवळून खून, आरोपीला अटक
Pune Crime News : पुण्यातील चाकण येथे एका तरुणीचा गळा आवळून खून करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.
पुणे : चाकणमध्ये 18 वर्षीय तरुणीचा गळा आवळून खून करण्यात आलाय. विष्णुकुमार सहा असं आरोपीचं नाव आहे तर प्रीती सहा असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे. चाकण पोलिसांनी विष्णुकुमार याला अटक केली आहे. घरात कोणी नसताना आरोपी विष्णुकुमार याने प्रीतीचा गळा आवळून तिचा खून केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रीती आणि आरोपी विष्णुकुमार हे नाणेकरवाडी (ता. खेड) येथे शेजारीच राहत होते. प्रीतीच्या आईचा काही कारणावरून विष्णुकुमार याच्यासोबत वाद झाला होता. ते दोघे एकाच कंपनीत काम करत होते. पण वादामुळे प्रीतीची आई विष्णुकुमार याच्यासोबत बोलत नव्हती. त्यामुळे प्रीतीने देखील त्याच्याशी बोलणं बंद केलं होतं. आई बोलत नसल्याने आधीच चिडलेल्या विष्णुकुमार याने आज घरात कोणी नसताना प्रीतीचा गळा दाबून खून केला. यानंतर, विष्णुकुमार त्याच्या रुममध्ये जाऊन शांत बसला. स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच चाकण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपी विष्णुकुमार याला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, पैशाच्या देवाणघेवाणीतून हा प्रकार घडला असल्याची माहिती समोर येत आहे. प्रीत घरात झोपलेली असताना आरोपीने तिचा गळा आवळून खून केला. शेजारच्या एका लहान मुलीने खिडकीतून हा सर्व प्रकार पहिला. त्या मुलीला याबाबत कोणाला काही सागून नकोस अशी धकमी संशयित आरोपीने दिली. त्यामुळे काही काळ या लहान मुलीने कोणाला काही सांगितले नाही. परंतु, काही वेळानंतर या लहान मुलीने घडलेला सर्व प्रकार तिच्या नातेवाइकांना सांगितला. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.
चाकण पोलिसांनी आरोपी विष्णुकुमार याला अटक केली असून. या घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे. विष्णुकुमार याने पैशाच्या वादातून प्रीतीचा खून केला की, यामागे आणखी काही कारण आहे, याबाबत पोलीस कसून तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या