एक्स्प्लोर

Pune News: पवना नदीत पोहण्याचा मोह बेतला जीवावर, पुण्यातील तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?

Pune News: उन्हाळ्याची सुट्टी आणि रविवारचा विकेंड एन्जॉय करण्यासाठी मावळ परिसरात आलेल्या पुण्याच्या तीन तरुणांचा पवना नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय.

Pune News: उन्हाळ्याची सुट्टी आणि रविवारचा विकेंड एन्जॉय करण्यासाठी मावळ (Maval) परिसरात आलेल्या पुण्याच्या (Pune) तीन तरुणांचा पवना नदीत (Pavana River) बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पवना नदीच्या पात्रात पोहण्याचा मोह या तरुणांच्या जीवावर बेतला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि मृतांच्या मित्रपरिवारात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Pune News: नेमकी घटना काय?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातून प्रथमेश शिंदे, अश्विन भालेराव आणि आयान शेख हे तीन मित्र रविवारी सुट्टीनिमित्त मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. सध्या राज्यासह पुणे जिल्ह्यात उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला आहे. 

याच उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी आणि थंडाव्यासाठी हे तिघेही थूगाव परिसरातील पवना नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र, नदीच्या पात्रातील पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही एकामागून एक पाण्यात बुडू लागले. आजूबाजूला असलेल्यांच्या ही बाब लक्षात येईपर्यंत तिघेही पाण्यात दिसेनासे झाले होते.

Pune News: तिन्ही तरुणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश

घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि लोणावळ्यातील प्रसिद्ध 'शिवदुर्ग मित्र' मंडळाच्या बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शोधमोहीम राबवून काही तासांच्या प्रयत्नांनंतर तिन्ही तरुणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

Pune News: प्रशासनाचे आवाहन

मावळ आणि लोणावळा परिसरात पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, नद्या, धरणे किंवा धबधब्यांच्या ठिकाणी पाण्याचा अंदाज न घेता उतरणे धोक्याचे ठरू शकते. वाढत्या उष्णतेमुळे अनेक पर्यटक पाण्याकडे आकर्षित होतात, परंतु सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याने अशा घटना घडतात. "नदी पात्रात किंवा धरणात पोहताना पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी आणि अपरिचित ठिकाणी पाण्यात उतरू नये," असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Amit Thackeray on Nasrapur Rape case: नसरापूर अत्याचार प्रकरणावरुन अमित ठाकरेंची सरकारवर जळजळीत टीका, म्हणाले, 'आतातरी डोकं ठिकाणावर येणार आहे का?'

Pune Bhor Crime: 'किरकोळ भांडणातून मला गोवलंय', नसरापूर प्रकरणातील नराधम आरोपीचा स्वत:च्या बचावासाठी धक्कादायक बनाव, न्यायालयात नेमकं काय घडलं?

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

NCP Vaishali Nagwade: राष्ट्रवादीने रुपाली चाकणकरांचा उत्तराधिकारी निवडला, सुनील तटकरेंचा मोठा निर्णय, कोण आहेत वैशाली नागवडे?
राष्ट्रवादीने रुपाली चाकणकरांचा उत्तराधिकारी निवडला, सुनील तटकरेंचा मोठा निर्णय, कोण आहेत वैशाली नागवडे?
Sanjay Kakde and Sharad Pawar: काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे
काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द, पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे 100 टक्के, पालिका आयुक्तांची माहिती
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द, पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे 100 टक्के, पालिका आयुक्तांची माहिती

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget