Pune News: तीन वर्गमित्र, तीन पक्ष अन् प्रभाग एक…राजकारणापलीकडची मैत्री, फुरसुंगी उरळी देवाचीमध्ये पहिल्यांदाच नगरपालिकेची निवडणूक, कोण मारणार बाजी याकडे सर्वांचं लक्ष
Pune News: भाजपकडून विराज करचे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून गिरीष ढोरे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून प्रकाश भारती अशी तीन मित्रांची नावे आहेत.

पुणे: पुण्यातील बारामती, फुरसुंगी-उरुळी देवाची नगर परिषद; तसेच लोणावळा, तळेगाव दाभाडे आणि दौंड या नगर परिषदेच्या काही प्रभागांमध्ये आज (शनिवारी) (Pune News) मतदान पार पडत आहे. फुरसुंगी-उरुळी देवाची नगर परिषदेची ही पहिली निवडणूक आहे. राज्यातील नगर परिषदांसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान पार पडले आहे. काही नगर परिषदा; तसेच प्रभागांसाठी आज, (शनिवारी) मतदान होणार आहे. उद्या, रविवारी सर्व नगर पालिकांचा निकाल जाहीर होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत (Pune News) असून, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदानापूर्वी मॉक पोल घेण्यात येईल. निवडणुकीचा प्रचार काल (शुक्रवारी, ता १९) रात्री दहा वाजता थांबल्याने प्रचार केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तर या निवडणुकीमध्ये फुरसुंगी उरळी देवाची या ठिकाणी होणारी निवडणूक चर्चेत आली आहे.(Pune News)
Pune News: तीन वर्गमित्र, तीन पक्ष अन् प्रभाग एक…राजकारणापलीकडची मैत्री चर्चेत
एक प्रभाग, एक जागा आणि एकाच वर्गातील तीन मित्र वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दोस्तीत कुस्ती नाय म्हणत हे तिघेही खेळीमेळीत रिंगणात उतरले आहेत. भाजपकडून विराज करचे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून गिरीष ढोरे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून प्रकाश भारती अशी तीन मित्रांची नावे आहेत. एक वकील, दुसरा इंजिनिअर आणि तिसरा उद्योजक आहे. तिघांची मैत्री राजकारणापलीकडची आहे. फुरसुंगी उरळी देवाची या ठिकाणी पहिल्यांदाच नगरपालिकेची निवडणूक पार पडत आहे. प्रभाग १ मधून तिघेही उमेदवार आहेत. आज त्याठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर उद्या निकाल जाहीर होणार आहेत.
आज होणाऱ्या या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी बारामतीमध्ये १४ आणि फुरसुंगी-उरुळी देवाची नगर परिषदेत सात उमेदवार आहेत. बारामती येथील ४१ जागांसाठी १५५ उमेदवार, फुरसुंगी-उरुळी देवाची येथील ३२ जागांसाठी १२० उमेदवार रिंगणात आहेत. दौंड येथील एका, लोणावळा येथील दोन आणि तळेगाव दाभाडे येथील पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. सर्व मतदान केंद्रांसाठी दीड हजार अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.























