MPSC Student Protest Pune : पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांचं मध्यरात्री शास्त्री रोडवर आंदोलन; सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचाही पाठिंबा, नेमक्या मागण्या काय?
MPSC Student Protest Pune : पोलिस उपनिरीक्षक पदाच्या भरतीची जाहिरात उशीरा प्रसिद्ध झाल्याचे सांगत या पदाची वयोमर्यादा एका वर्षाने वाढवण्याची मागणी राज्यभरातून स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी करत आहेत.

पुणे: पुण्यात काल गुरूवारी(ता १) एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी (MPSC Student Protest) रात्री १.१३ वाजता रस्त्यावर बसून आंदोलन केलं. पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याने व वयोमर्यादा वाढीसाठी पुण्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काल रात्री रस्त्यावर उतरत आंदोलन केलं. विद्यार्थी आंदोलकांना (MPSC Student Protest) मध्यरात्री रस्त्यावरुन पोलिसांनी हटवले. आचारसंहिता लागू असल्याने आंदोलनाची परवानगी विद्यार्थ्यांना नव्हती, रात्री उशिरा विद्यार्थ्यांनी रसत्यावर उतरत आंदोलन केलं.(MPSC Student Protest)
MPSC Student Protest Pune : नेमकं काय प्रकरण?
पुण्यात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मध्यरात्री १.१३ वाजता आंदोलन सुरू केलं. पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याने व वयोमर्यादा वाढीसाठी पुण्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आंदोलन सुरू केलं होतं. पुण्यातील शास्त्री रोडवर बसून स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. पोलिस उपनिरीक्षक पदाच्या भरतीची जाहिरात उशीरा प्रसिद्ध झाल्याचे सांगत या पदाची वयोमर्यादा एका वर्षाने वाढवण्याची मागणी राज्यभरातून स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी करत आहेत. यासंदर्भात वेळोवेळी निवेदन देऊनही सरकार दखल घेत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. पुण्यातील शास्त्री रोडवरती स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. विद्यार्थी आंदोलकांना मध्यरात्री रस्त्यावरुन पोलिसांनी हटवले. आचारसंहिता लागू असल्याने आंदोलनाची परवानगी विद्यार्थ्यांना नव्हती.(MPSC Student Protest)
MPSC Student Protest Pune :अन्यथा मी विद्यार्थ्यांसमवेत आंदोनात सामील होईल - बच्चू कडू
याप्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडुंनी देखील याबाबत सरकारला इशारा दिला आहे, काल स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या आंदोलकांचे फोटो शेअर करत त्यांनी पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "MPSC PSI वयवाढ बाबत गेल्या 6 महिन्यांपासून विद्यार्थी प्रयत्न करून, 80+ लोकप्रतिनिधीमार्फत सरकार दरबारी पाठपुरावा विनंती करून सुद्धा न्याय न मिळाल्यामुळे शांतता मार्गाने /गांधीमार्गाने विद्ध्यार्थी न्यायासाठी पुण्यात रस्त्यावर उतरले आहेत, सरकारने तात्काळ विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा मी विद्यार्थ्यांसमवेत आंदोनात सामील होऊन न्याय मिळेपर्यंत आंदोलन करेल. DCP रावळे सोबत माझी चर्चा झाली असून, पोलीस विद्यार्थ्यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी आश्वासित केले असून विद्यार्थ्यांनी कायदा हाती नं घेता शांतता मार्गाने आंदोलन करावे #PSI_वयवाढ_1वर्ष_GR", असंही बच्चू कडुंनी म्हटलं आहे.
MPSC PSI वयवाढ बाबत गेल्या 6 महिन्यांपासून विद्यार्थी प्रयत्न करून, 80+ लोकप्रतिनिधीमार्फत सरकार दरबारी पाठपुरावा विनंती करून सुद्धा न्याय न मिळाल्यामुळे
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) January 1, 2026
शांतता मार्गाने /गांधीमार्गाने विद्ध्यार्थी न्यायासाठी पुण्यात रस्त्यावर उतरले आहेत, सरकारने तात्काळ विद्यार्थ्यांना न्याय… pic.twitter.com/TLetRWud6W
MPSC Student Protest Pune : मागणी नेमकी काय आहे?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) ४ जानेवारीला महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ही परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र जाहिरात २९ जुलै २०२५ ला प्रसिद्ध झाली आहे. त्यात वय मर्यादा गणना दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५ अशी आहे. जाहिरात येण्यासाठी सात महिने उशीर झालेला आहे. त्यामुळे अनेक उमेदवार अपात्र ठरून त्यांच्या हातातून ही संधी हिरावली जाणार असल्याची भीती स्पर्धा परीक्षा उमेदवारांना आहे, त्यामुळे त्याची वयोमर्यादा वाढवण्याची, वयोमर्यादा गणना करण्याचा कालावधी १ जानेवारी २०२५ गृहित धरण्याची मागणी केली जात आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI























