Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
LIVE
Background
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचं आज दीक्षांत संचलन
पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचं दीक्षांत संचलन आज होत आहे. एनडीएतील खडतर प्रशिक्षणानंतर एनडीए ची 141 वी तुकडी प्रत्यक्ष देशसेवेसाठी भारतीय संरक्षण दलात दाखल होणार आहे. एनडीएतील क्षेत्रपाल मैदानावर हा शानदार सोहळा संपन्न होत आहे. लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे दीक्षांत संचालनाची मानवंदना स्वीकारणार आहेत. लष्करी शिस्त, सेवाभाव आणि राष्ट्रभक्तीचं दर्शन या सोहळ्यामधून घडतं. लष्करी हेलिकॉफटर्स तसेच लढाऊ विमानांची सलामी हे या सोहळ्याचं विशेष आकर्षण असतं. एनडीएतील प्रशिक्षणादरम्यान विशेष कामगिरी केलेल्या कडेट्स चा याप्रसंगी पदकं देऊन गौरव करण्यात येत. दीक्षांत संचालनाचा हा सोहळा कडेट्स साठी स्वप्नपूर्तीचा अनुभव असतो. इथून बाहेर पडल्यानंतर ते सैन्यदलात अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत. देशवासीयांसाठी हा मोठा अभिमानाचा क्षण म्हणता येईल.
किरण गोसावीला आठ दिवसांची पोलीस कोठडी
किरण गोसावीला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. किरण गोसावी याच्याविरोधात ठाणे, कळवा, अंधेरी, पालघर अशा अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत. किरण गोसावीने अनेक तरुणांना फसवले आहे. त्याचा तपास करायचा असल्याने किरण गोसावीची 10 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी सरकारी वकिलांची मागणी केली होती.
किरण गोसावीला 10 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, सरकारी वकिलांची मागणी
किरण गोसावी विरोधात 2018 मधे गुन्ह्याची नोंद आहे. त्याच्याविरोधात एप्रिल 2019 मधे चार्जशीट पाठवण्यात आली. किरण गोसिवीची सेक्रेटरी शेरबानो कुरेशी हीच्या अकांउटमधे चिन्मय देशमुखने तीन लाख रुपये पाठवले होते. मात्र, शेरबानो कुरेशीचे हे अकांउट किरण गोसावी बनावट कागदपत्रांच्या आधारे वापरत होता. पैसै परत मागितल्यावर त्याने चिन्मय देशमुखला धमकी दिली आणि शिवीगाळ केली. किरण गोसावी विरुद्ध ठाणे, कळवा, अंधेरी, पालघर अशा अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत. किरण गोसावीने अनेक तरुणांना फसवले आहे. यामधे अनेकांची मोठी फसवणूक झालीय. त्याचा तपास करायचा असल्याने किरण गोसावीची 10 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी सरकारी वकिलांनी मागणी केली आहे.
साखर आयुक्तांनी दिला शेतकऱ्यांचं वीजबिल ऊस बिलातून वसूल करण्याचा आदेश
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या कार्यालयाकडून सर्व साखर कारखान्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. महावितरणकडून करण्यात आलेल्या मागणीनंतर राज्यातील थकित विज बिल वसुलीसाठी साखर आयुक्तांचे आदेश आहेत. राज्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांकडून थकित वीज उसाच्या बीलातुन वसुल करण्यात येणार आहे.
पुण्यात गेल्या 24 तासात 57 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 110 रुग्णांनी केली कोरोनावर मात
पुण्यात गेल्या 24 तासात 57 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 110 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 494290 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही कोरनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. सध्या पुण्यात 792 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 5493 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.
पुण्यात 125 डेसीबलपेक्षा जास्त आवाजाचे साखळी फटाके उडविण्यास मनाई
दिपावली उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरचे पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 नुसार पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात 1 नोव्हेंबर मध्यरात्रीपासून ते 30 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या फटाक्यावर रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण मनाई केली आहे. या कालावधीत 100 पेक्षा जास्त फटाके असलेल्या आणि 125 डेसीबल पेक्षा जास्त आवाज निर्माण करणारे सर्व साखळी फटाके उडविण्यासदेखील मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही रस्त्यावर किंवा रस्त्यापासून 50 फुटाच्या आत कोणतेही फटाके स्वैरपणे उडविणे किंवा दारु काम सोडणे किंवा फेकणे अगर आगी फुगे (फायर बलून) किंवा अग्नीबाण सोडणे, उडविणे असे कृत्य करणे, एखादा फटाका उडविण्याच्या जागेपासून 4 मीटर अंतरावर 125 डेसीबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्याचे उत्पादन विक्री व वापरण्यास मनाई करण्यात येत आहे.
साखळी फटाका 50 ते 100 तसेच 100 व त्यावरील फटाके असतील तर आवाजाची मर्यादा फटाका उडविण्याच्या जागेपासून 4 मीटर अंतरापर्यंत अनुक्रमे 110 किंवा 115 व 125 डेसीबलपेक्षा जास्त असता कामा नये. या आदेशाचे उल्लंघन करणारे व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनीयमाच्या कलम 131 प्रमाणे कायदेशीर शिक्षेस पात्र राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेवर दिव्यांगांचा आक्रोश मोर्चा
विविध मागण्यांसाठी दिव्यांग जिल्हा परिषदेवर एकवटले आहेत. एक हजार रुपये असलेला दिव्यांग भत्ता पुन्हा सुरू करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. जिल्हा परिषद पाच टक्के दिव्यांग निधीमधून साडेतीन कोटी रुपये ddrc इमारत बांधण्यासाठी केलेली तरतूद रद्द करून रोजगारासाठी व अपंग बचत गटासाठी अर्थ साहाय्य करा, अशीही त्यांची मागणी आहे. ग्रामपंचायत पाच टक्के दिव्यांग निधी तात्काळ वाटप करा या मागण्यांसाठी दिव्यांग एकवटले आहेत.