(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune leopard : जुन्नरमध्ये बिबट्यांचा थेट घरात घुसण्याचा प्रयत्न; थरारक व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद
पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जंगली प्राण्यांनी हैदोस घातला आहे. मानवी वस्तीत शिरल्याच्या अनेक घटनाही समोर आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये आजही जंगली जनावरांची दहशत आह.
Pune leopard : पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जंगली प्राण्यांनी हैदोस घातला आहे. मानवी वस्तीत शिरल्याच्या अनेक घटनाही समोर आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये आजही जंगली जनावरांची दहशत आहे. मानवी वस्तीत थेट बिबटा शिरला आहे. आतापर्यंत अनेकदा तालुक्यात बिबट्यांचा थेट वावर आपण सगळ्यांनीच पाहिला आहे. या सगळ्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
सध्या एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. एक-दोन नाही तर तीन बिबटे एका घरात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. बिबट्यांनी आजपर्यंत अनेकदा थेट रस्त्यावरून जाणाऱ्या शेतकऱ्यांवर हल्ले केले आहेत. तर गावाच्या रस्त्यांवर देखील अनेकदा बिबट्यांचा थेट वावर असलेले दिसून आले आहे. विवेक गुप्ता यांच्या ट्विटर अकाउंट वरून एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ जुन्नर तालुक्यातील असून मध्यरात्रीच्या वेळी तीन बिबटे एका घरात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचं यामध्ये स्पष्ट दिसून येते आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलं असून, रात्री अपरात्री उसाच्या शेतात जाताना काळजी घेण्याचा आवाहन वनविभागाने केलं आहे.
जब पुणे जिले के जुन्नर में तेंदुए का पूरा परिवार एक घर में पहुंचा.. pic.twitter.com/lfdEA9sbiO
— Vivek Gupta (@imvivekgupta) March 6, 2023
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
बिबटाचा असा मोकळा वावर असलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र हाच व्हिडीओ पाहून अनेकांच्या मनात धडकीदेखील भरताना दिसत आहे. बिबट्यांच्या अशा मोकळ्या वावरामुळे अनेकदा शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झाल्याचं बघायला मिळालं आहे. त्यातच हा व्हिडीओ समोर आल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
चाकणमध्येही बिबट्याचा धुमाकूळ
काही दिवसांपूर्वी पुण्यातील चाकण परिसरात बिबटा भरलोकवस्तीत शिरला होता भर लोकवस्तीत बिबट्या दिसून आल्यानंतर वन विभाग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. एका पडक्या घरात बिबट्या बसला असल्याची माहिती समोर आली होती. चाकण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हा बिबट्या आढळून आला होता. त्यानंतर आता वन विभागाच्या रेस्क्यू टीमकडून या बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले गेले. येथे बाजार आणि बघ्यांची गर्दी यामुळे रेस्क्यू टीमला अडचणीचा सामना करावा लागला. बघ्यांच्या गर्दीमुळे काहीवेळ रेस्क्यू टीम विस्कळीत झाली होती. मात्र त्यानंतर त्यांनी गर्दी आटोक्यात आली. असा बिबट्याचा मोकळा वावर पाहून अनेकांचे धाबे दणाणले होते.