Ravindra Dhangekar Chandrakant Patil : 'अगं चंपाबाई धंगेकरला जीव थोडा लाव'; नव्या गाण्याची जोरदार चर्चा, पुन्हा वादाला तोंड फुटणार?
पुण्यातील पोटनिवडणुकीपासून (Ravindra Dhangekar) पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि नवनिर्वाचीत आमदार रवींद्र धंगेकर यांच्यात खडागंजी आणि दोषारोप सुरुच आहे. नव्या गाण्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे.
Ravindra Dhangekar Chandrakant Patil : पुण्यातील पोटनिवडणुकीपासून (Ravindra Dhangekar) पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil) आणि नवनिर्वाचीत आमदार रवींद्र धंगेकर यांच्यात खडागंजी आणि दोषारोप सुरुच आहे. 'हू ईज धंगेकर' असा चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीच्या वेळी विचारलेला प्रश्न चांगलाच गाजला आणि आता या दोघांच्याही वादावादीवर नवं गाणं तयार करण्यात आलं आहे. या गाण्यात चंद्रकांत पाटलांवर टीका करण्यात आली आहे, शिवाय चंपाबाई असा चंद्रकांत पाटलांचा उल्लेख करण्यात आला आहे.
चंद्रकांत पाटील आणि रवींद्र धंगेकर यांच्यातील वाद काही संपायचं नाव घेत नाही आहे. त्यातच आता नव्या गाण्याची भर पडली आहे. 'एकजुटीने साऱ्यांच्या मताने कसा उधळून लावलाय डाव, हू इज धंगेकर, चंपाबाई धंगेकरला जीव थोडा लाव. चंपा बाई आमदाराला जीव थोडा लाव', असे या गाण्याचे बोल आहेत. उमेश गवळी आणि प्रदीक कांबळे यांनी हे गाणं लिहिलं आणि गायलं आहे. पालकमंत्री आणि ज्येष्ठ नेते असलेल्या चंद्रकांत पाटील यांचा चंपाबाई असा उल्लेख केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
गाण्याची सर्वत्र चर्चा
धंगेकर आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद सगळ्यांनाच माहिती झाला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांवर टीका करण्यात आलेल्या या गाण्याची सध्या तुफान चर्चा सुरु आहे. मात्र या गाण्यावर चंद्रकांत पाटील आता काय उत्तर देतात? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
गाण्यात चंद्रकांत पाटलांचा चंपाबाई असा उल्लेख...
एकजुटीनं साऱ्यांच्या मतानं कसा उधळून टाकलाय डाव… हु इज धंगेकर?
अगं चंपाबाई, आमदाराला जीव थोडा लाव…
पुण्यात इतिहास घडला, एक नेता साऱ्यांना पुरून उरला
किती सभा घेतल्या, किती नोटा वाटल्या
पैसेवाल्यांना मी दावला मी दाव, असा हा रवींद्र भाव…
कसब्याचा बादशाह हाय यो, चंपाबाई…
'हू इज धंगेकर' काय आहे प्रकरण?
भाजपने यंदा धंगेकरांना पराभूत करण्यासाठी चांगलीच फौज मैदानात उतरवली होती. रोड शो, प्रचारसभा, कोपरा सभा घेतल्या होत्या. त्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील मैदानात उतरले होते. त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी प्रचार सभेत रविंद्र धंगेकरांना चांगलंच डिवचलं होतं. भरसभेत हू ईज धंगेकर तो आमच्यासमोर टिकू शकत नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर धंगेकरांचे समर्थक पेटून उटले होते त्यांनी सगळ्या कसब्यात पुणेरी पाट्या लावल्या होत्या. आज विजयानंतर त्यांनी ही कविता व्हायरल करुन चंद्रकात पाटलांना चांंगलंच उत्तर दिलं होतं. धंगेकर नाऊ... MLA असं सगळीकडे व्हायरल झालं होतं.