एक्स्प्लोर

Pune News : दुचाकी घेताना ग्राहकांना दोन हेल्मेट देणं अनिवार्य, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आदेश

Pune News : रस्त्यावरील होत असणाऱ्या सततच्या अपघातांमुळे होणाऱ्या जीवितहानी रोखण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने हा निर्णय घेतला आहे.

पुणे : पुण्यात अनेकदा हेल्मेटसक्ती झाली, पण नंतर ती शिथिल देखील झाली, त्यानंतर आता पुण्यात दुचाकीस्वार आणि मागे बसणाऱ्या व्यक्तीने देखील हेल्मेट घालावे यासाठी पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नवी युक्ती शोधली आहे. पुण्यात दुचाकी विकणाऱ्या शोरूमला दुचाकी खरेदी केल्यानंतर हेल्मेट देण्यासाठी सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नवी दुचाकी विकताना ग्राहकांना दोन हेल्मेट देणे आता अनिवार्य असणार आहे. वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे शोरूममधून दुचाकीची विक्री करणाऱ्यांना दोन हेल्मेट देणं बंधनकारक असणार आहे. मात्र, यामुळे दुचाकींच्या किमतीत काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. 

वाढणारे अपघात, गाड्यांची संख्या, वाहतूक कोंडी यामुळे नियम अधिक कडक करणं आवश्यक आहे. त्यासाठी आता पुण्यातील दुचाकीस्वारांसह मागे बसणाऱ्यांनी हेल्मेट नियमित घालावे यासाठी पुणे परिवहन विभागाने मोठे आदेश दिले आहेत. यासंबधीचे एक पत्रक देखील त्यांनी काढलं आहे. 

पत्रकात काय म्हटलं आहे?


भारतात व महाराष्ट्रात रस्ते अपघातात दुचाकी वाहनचालकांची बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच दुचाकी अपघातामध्ये होणाऱ्या मृत्यूंची संख्या लक्षणीय आहे. दुचाकीस्वारांनी जर हेल्मेटचा वापर केला तर अपघातामध्ये होणा-या मृत्युंच्या संख्येमध्ये निश्चित घट होवू शकते. त्यामुळे वाहनचालकाने स्वतः आणि सोबत बसलेल्या व्यक्तीने रस्ता सुरक्षा मानकांची पूर्तता करणा-या हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक आहे. तसेच केंद्रिय मोटार वाहन नियम, 1989 मधील नियम 138 नुसार नविन दुचाकी वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना, खरेदीवेळी वाहन वितरकाने दोन हेल्मेट पुरविणे आवश्यक आहे. याबाबत दुचाकी वितरकांना सुचना देण्यात आलेल्या आहेत. नविन दुचाकी खरेदी करणाऱ्या सर्व नागरीकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, वाहन ताब्यात घेतेवेळी वाहन वितरकाकडून दोन हेल्मेट प्राप्त करून घ्यावीत, असं पत्रकामध्ये लिहलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ranji Trophy : 6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
Nitesh Rane : कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
Jalgaon Accident Update: जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
Rohit Sharma fail Ranji Trophy : 3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Crime : कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या,पुण्यात कौर्याची परिसीमा,खून केल्यावर व्हिडीओ चित्रीतWalmik Karad Hospitalized : वाल्मिक कराड मध्यरात्री रुग्णालयात, डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण...Ajit Pawar Sharad Pawar :शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं, अजित पवार यांनी मंचावरील नेम प्लेट बदललीABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 23 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ranji Trophy : 6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
Nitesh Rane : कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
Jalgaon Accident Update: जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
Rohit Sharma fail Ranji Trophy : 3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Sangram Jagtap : मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
Model Ezra Vandan Arrested: प्रसिद्ध मॉडेलची 24 तासांत 100 पुरूषांसोबत झोपण्याची घोषणा; पोलिसांनी तात्काळ धाव घेत ठोकल्या बेड्या
प्रसिद्ध मॉडेलची 24 तासांत 100 पुरूषांसोबत झोपण्याची घोषणा; पोलिसांनी तात्काळ धाव घेत ठोकल्या बेड्या
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
Embed widget