एक्स्प्लोर

Pune News : पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने खळबळ, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 रिकामे

Maharashtra Pune News : पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. खबरदारी म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 रिकामे करण्यात आले आहेत. काही काळासाठी रेल्वे वाहतूकही थांबवण्यात आली

Pune Railway Station: पुणे रेल्वे स्टेशनवर (Pune Railway Station) बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे. खबरदारी म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहे. शिवाय बॉम्ब शोधक नाशक पथक रेल्वे स्थानकात दाखल झालं असून संबंधित वस्तूची तपासणी केली जात आहे. इतकंच नाही तर काही काळासाठी रेल्वे वाहतूकही थांबवण्यात आली होती. ही वस्तू नेमकी काय आहे याबाबत अद्याप समजू शकलेलं नाही. 

बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने रेल्वे स्टेशनवर तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांनी लगेचच प्रवाशांना स्थानक रिकामं करण्याची सूचना दिली. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वर जाण्यासाठी सध्या कोणालाही परवानगी नाही. ही वस्तू इथे कशी आली, कोणी आणली या संदर्भात चौकशी सुरु आहे. अद्याप या वस्तूची स्पष्टता होऊ शकलेली नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून स्थानकात उपस्थित असलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे.


Pune News : पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने खळबळ, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 रिकामे

पुणे रेल्वे स्थानक (Pune Railway Station) परिसरात बॉम्बसदृश वस्तू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्क्वॉड पथकही घटनास्थळी दाखल झालं आहे. पुणे स्टेशनवर येणाऱ्या गाड्यांना यार्डमध्ये थांबवण्यात आलं होतं. तासाभराने रेल्वेची वाहतूक सुरु करण्यात आली. संपूर्ण परिसरात पोलीस आणि बॉम्बशोधक पथक दिसत आहे. परिसरात तणावाचं वातावरण आहे. 

यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता रेल्वे स्थानकात दाखल झाले असून त्यांनी परिसराची पाहणी केली. यानंतर माध्यमांशी बोलताना पोलीस आयुक्त म्हणाले की, "आज सकाळी साडेदहा वाजता रेल्वे पोलीस स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. प्राथमिक माहितीनुसार संबंधित वस्तू जिलेटीन नसल्याचं समोर आलं आहे. पुढील तपास करत आहोत. पॅनिक होण्याची गरज नाही."

चार ते पाच दिवसांपूर्वी पुणे नियंत्रण कक्षात निनावी कॉल आला होता, ज्यात पुणे रेल्वे परिसरात बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देण्यात आली होती. तपास केला असता तो फेक कॉल असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आज पुणे रेल्वे स्टेशन परिसरात बॉम्बसदृश्य वस्तू आढळली आहे. 

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Maharashtra Goverment Cabinet Decision: मुंबईत गोपाळकाला ऐवजी रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय
मुंबईत गोपाळकाला ऐवजी रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय
Pune Baramati Crime News: आई...अथर्वला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचेत; तरुणीचा आईला फोन आणि काही तासांत मृत्यू; आता मैत्रिणीने सांगितली अंगावर काटा आणणारी माहिती
आई...अथर्वला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचेत; तरुणीचा आईला फोन आणि काही तासांत मृत्यू; आता मैत्रिणीने सांगितली अंगावर काटा आणणारी माहिती

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget