एक्स्प्लोर
पुणे महापालिकेचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचं निधन
पुणे : पुणे महापालिकेचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. मॉर्निंग वॉकसाठी निघाले असताना त्यांना सकाळीच हृदयविकाराचा झटका आला होता.
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालं. काही महिन्यांपूर्वीच नवनाथ कांबळे यांनी उपमहापौर म्हणून पदभार स्विकारला होता.
भाजपने पुण्यात एकहाती सत्ता मिळाल्यानंतर मित्रपक्ष आरपीआयला (आठवले गट) उपमहापौर दिलं. आरपीआयकडून उपमहापौर म्हणून नवनाथ कांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. फेब्रुवारीमध्ये झालेल्या निवडणुकीत कांबळे कोरेगाव मतदार संघातून भाजपच्या चिन्हावर निवडून आले होते.
महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करण्याचा निर्णय आरपीआयने घेतला होता. शहरातील 162 जागांपैकी दहा जागांवर आरपीआयला उमेदवारी देण्यात आली होती. दहापैकी पाच जागांवर आरपीआयचे उमेदवार निवडून आले.
नवनाथ कांबळे हे आरपीआयचे ज्येष्ठ कार्यकर्ते असून दलित पँथरमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. 1997 मध्ये ते प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 2002 मध्ये झालेल्या त्रिदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये प्रभाग क्रमांक चौदा (किलरेस्कर न्यूमॅटिक कंपनी) या प्रभागातून ते विजयी झाले होते. निवडून आल्यानंतर शहर सुधारणा समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. आरपीआयचे शहराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement