एक्स्प्लोर
पुण्यातील पेशवेकालीन मुजुमदार वाड्याला महापालिकेकडून धक्का
पुण्यातील पेशवेकालीन ऐतिहासीक मुजुमदार वाडा धक्का लावण्याचं काम महापालिकेकडून झालं आहे. विशेष म्हणजे, याची नुकसानपाई देण्यासही महापालिकेने नकार दिला जात आहे.
पुणे : पुण्यातील पेशवेकालीन ऐतिहासीक मुजुमदार वाडा धक्का लावण्याचं काम महापालिकेकडून झालं आहे. विशेष म्हणजे, याची नुकसानपाई देण्यासही महापालिकेने नकार दिला जात आहे. त्यामुळे पेशवेकालीन संस्कृतीचा अखेरचा दुवा असलेला हा वाडा वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील इतिहास अभ्यासक संवेदनशील व्यक्ती आणि सामान्य पुणेकरांनी पुढाकार घेतला आहे.
1770 साली शनिवारवाड्याजवळ मुजुमदार वाड्याची उभारणी केली होती. 100 खोल्यांचा हा वाडा वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. शिवाय या वाड्यात अनेक पेशवेकालीन वस्तू आहेत. त्यात 17 व्या शतकातील भांडी, कागदपत्रं, वाद्यांचा समावेश आहे.
मात्र, महापालिकेनं अतिक्रमण हटवताना या वाड्याच्या भिंतीला धक्का लावला आहे. वाड्याच्या शेजारील अनधिकृत बांधकाम पाडताना वाड्याची पूर्वेकडील भींत आणि पायाला धक्का लागला. यामुळे आणि वाड्याचा पूर्वेकडील भाग एकीकडे झुकला.
महापालिकेच्या हलगर्जीपणावर वाड्याचे नुकसान भरुन देण्याची मागणी अनुपमा मुजुमदार यांनी मनपाकडे केली. पण महापालिकेच्या बांधकाम विभागाने जबाबदारी झटकत, ज्यांच्या अनधिकृत बांधकामामुळे वाड्याला धोका पोहोचला, त्यांच्याकडून भरपाई घ्या, असा अजब सल्ला दिला.
वास्तविक, महापालिकेनं या वास्तूला स्थानिक ऐतिहासिक वारसा म्हणून हा वाडा घोषित केला आहे. मात्र, त्याच्या डागडुजीकडे अजिबात लक्ष न दिल्यानं पुणेकर, इतिहास अभ्यासक नाराज आहेत. त्यातच आता महापालिकेकडूनच वाड्याला धक्का लावण्यात आला. पण त्याची नुकसान भरपाई देण्यास मनपाकडून नकार दिला जात आहे.
दरम्यान, महापौर मुक्ता टिळक यांनीही या प्रकरणी हात वर केले आहेत. मुजुमदार वाडा ही खाजगी मालमत्ता असल्यानं, कोणतीही मदत देता येणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement