(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Metro News : विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; पुणे मेट्रोकडून "एक पुणे विद्यार्थी पास" ची घोषणा, कसा मिळेल पास?
Pune Metro: विद्यार्थ्यांच्या प्रवासाची चिंता मिटली आहे. पुणे मेट्रोनं "एक पुणे विद्यार्थी पास" ची घोषणा केली आहे.
पुणे : विद्यार्थ्यांच्या प्रवासाची चिंता (Pune Metro) मिटली आहे. पुणे मेट्रोकडून आता विद्यार्थ्यांना खास पास मिळणार आहे. पुणे मेट्रोनं "एक पुणे विद्यार्थी पास" ची घोषणा केली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचा प्रवास सोपा होणार आहे. पुणे मेट्रो सुरुवातीला विद्यार्थ्यांना 10 हजार कार्ड मोफत देणार आहेत. एक पुणे विद्यार्थी पास वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना पुणे मेट्रोमधील सर्व तिकीट व्यवहारांवर 30 टक्के सवलतीचा फायदा होईल, असं पुणे मेट्रोकडून सांगण्यात आलं आहे.
कसा मिळणार पास?
- पुणे मेट्रोचा पास मिळवण्यासाठी विद्यार्थी https://customerportal.hdfcbankonepune.in/eform/या लिंकवर क्लिक करुन माहिती भरू शकतात किंवा QR कोड स्कॅन करू शकतात आणि कोणत्याही मेट्रो स्टेशनवर कार्ड मिळवू शकतात.
-"एक पुणे विद्यार्थी पास" हे HDFC बँकेच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) प्रीपेड असणार आहे.
- हा पास विद्यार्थ्यांसाठी मेट्रो प्रवास सुलभ करण्यासाठी, व्यवहाराच्या कमी वेळेसह जलद, सुरक्षित आणि कॅशलेस व्यवहार करण्यासाठी तयार करण्यात आलं आहे.
-"एक पुणे विद्यर्थी पास" कार्ड घेण्यासाठी 13 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे, त्याखालील वय असणारे विद्यर्थी हे कार्ड घेऊ शकत नाहीत.
- 13 ते 16 वर्षे वय असणारे विद्यार्थी पॅन कार्ड नसल्यास एक ई-फॉर्म भरून आपले "एक पुणे विद्यर्थी पास" कार्ड प्राप्त करू शकतात. यासाठी आधार कार्डच्या शेवटच्या चार क्रमांकाची आवश्यकता असेल.
-हे "एक पुणे विद्यार्थी पास" कार्ड घेण्यासाठी महाविद्यालयाचे अधिकृत ओळखपत्र किंवा चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक असेल.
-हे कार्ड घेणाऱ्या प्रत्येक विद्यर्थ्याला तिकीट दरामध्ये 30% सवलत लागू करण्यात आली आहे.
-या कार्डची वैधता 3 वर्षे आहे.
-पहिल्या 10,000 विद्यार्थ्यांना "एक पुणे विद्यर्थी पास" हे मोफत दिले जाणार आहे. त्यानंतर कार्डची किंमत 150 रुपये असेल.
- प्रवासी पुणे मेट्रोच्या Website वर उपलब्ध ई-फॉर्म भरून "एक पुणे विद्यर्थी पास" मिळवू शकता.
विद्यार्थ्यांसाठी मेट्रोचा महत्वाचा निर्णय...
पुण्यात देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येत असतात. त्यात अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी येतात. अनेक विद्यार्थ्यांना आता या पासमुळे फायदा होणार आहे. शिवाय पैशाचीदेखील बचत होणार आहे. त्यामुळे पुणे मेट्रोकडून देण्यात येणारा पास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी काढावा, असं आवाहन पुणे मेट्रोकडून करण्यात आलं आहे.
इतर महत्वाची बातमी-
कल्याण स्टेशनवर भीषण दुर्घटना, धावत्या डेक्कन क्वीनमधून उतरताना भावांचा अपघात, एकाचा मृत्यू