एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

पुण्यातील एमआयटी शाळेच्या अटी अखेर मागे

शाळेतील विद्यार्थिनींनी पांढऱ्या आणि स्किन रंगाची अंतवस्त्रे घालावी, स्कर्टची लांबी ठराविक हवी, पालकांनी एकमेकांशी बोलू नये, विद्यार्थ्यांनी केस एकदम लहान ठेवावे, पालकांनी शाळेच्या विरोधात आंदोलन करु नये अशाप्रकारचे नियम विद्यार्थ्यांना घालण्यात आले होते.

पुणे : पुण्यातील माईर्स एमआयटीच्या विश्वशांती गुरुकुल शाळेने विद्यार्थी आणि पालकांवर लादलेल्या वादग्रस्त अटी आणि नियम अखेर मागे घेतले आहेत. पालकांनी अटींविरोधात आवाज उठवल्यानंतर, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर पुणे महापालिकेची शिक्षण समिती तसंच राज्याच्या शिक्षण उपसंचालिकांची टीम चौकशी शाळेत दाखल झाली होती. यानंतर झालेल्या चर्चेनंतर शाळेने घातलेल्या अटी आणि नियम मागे घेतल्याचं जाहीर केलं. शाळा प्रशासनाने यासंदर्भात निवेदन जारी केलं आहे. "शाळा प्रशासनाने विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या गणवेशासंदर्भात डायरीमध्ये दिलेल्या सूचना या कोणाच्याही वैयक्तिक अथवा सामूहिक भावना दुखावण्याचा हेतू शाळा प्रशासनाचा नव्हता आणि नाही. याबाबत शाळेच्या प्रशासनाकडून सदैव विद्यार्थी केंद्रीत विचार करुन संबंधित डायरी आणि सूचना मागे घेण्यात येत आहे," असं या निवेदनात म्हटलं आहे. पुण्यातील एमआयटी शाळेच्या अटी अखेर मागे शाळेतील विद्यार्थिनींनी पांढऱ्या आणि स्किन रंगाची अंतवस्त्रे घालावी, स्कर्टची लांबी ठराविक हवी, पालकांनी एकमेकांशी बोलू नये, विद्यार्थ्यांनी केस एकदम लहान ठेवावे, पालकांनी शाळेच्या विरोधात आंदोलन करु नये अशाप्रकारचे नियम विद्यार्थ्यांना घालण्यात आले होते. या अटींचा भंग केल्यास पालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असंही या नियमांमध्ये नमूद करण्यात आलं होतं. विद्यार्थी आणि पालकांसाठी डायरीमार्फत नियमावली जाहीर करण्यात आली होती. यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली. पालकांनी शाळेचा निषेध करत आवाज उठवला. वादग्रस्त नियम आणि अटी घातल्याबद्दल शाळेवर कारवाई करण्याची मागणी पालक करत होते. त्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या संपूर्ण प्रकाराबद्दल शाळेची चौकशी करण्याचा आदेश दिला. त्यानुसार चौकशी पथक शाळेत दाखल झालं. राज्याच्या शिक्षण उपसंचालिका मिनाक्षी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाच्या समितीने एमआयटी शाळेमध्ये जाऊन शाळा प्रशासनासोबत चर्चा केली. त्यानंतर शाळेने नियम आणि अटी मागे घेण्याचा निर्णय घेतला. इथून पुढे नियम आणि अटी ठरवताना राज्याच्या शिक्षण उपसंचालिकांच्या सल्ला घ्यावा, अशा सूचना  शाळेला देण्यात आल्या आहेत. मात्र झाल्या प्रकाराबद्दल शाळेवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचं शिक्षण विभागाने स्पष्ट केलं. शाळेच्या डायरीत नमूद केलेले नियम- - मुलींची अंतर्वस्त्र पांढऱ्या किंवा क्रीम रंगाची असावीत. - लिपस्टिक, लिप ग्लॉस किंवा अन्य कुठलीही कॉस्मेटिक्स लावायचे नाहीत - कानातले सोडून कोणतेच दागिने घालायचे नाहीत - 0.3 cm च्या आकारापेक्षा मोठे कानातले घालायचे नाहीत. त्यांचा रंगही काळा, सोनेरी किंवा चंदेरी असावा. - सायकलच्या पार्किंगसाठी वार्षिक 1500 फी तसंच हेल्मेट सक्तीचं आहे. - शाळेच्या परवानगीशिवाय विद्यार्थी आणि पालक, शाळेत किंवा शाळेच्या कॅम्पसच्या बाहेर कुठल्याही सामाजिक, धार्मिक किंवा राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचं नाही. - विद्यार्थी आणि पालकांनी शाळेविरोधात आंदोलन करु नये दरम्यान, विद्यार्थ्यांना शिस्त लागावी आणि मुलींची छेडछाड होऊ नये म्हणून हे नियम तयार केल्याचं शाळेच्या प्रशासनाने सांगितलं. मात्र पालकांनी माध्यमांसमोर जाण्याच्या आधी शाळेशी बोलायला हवं होतं, असंही शाळा प्रशासनाने म्हटलं होत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget