Pune By Poll Election : पुणे लोकसभा पोटनिवडणुकीला अखेर पूर्णविराम; उच्च न्यायालयाच्या आदेशाला 'सर्वोच्च' स्थगिती
Pune By Poll Election: सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत पुणे लोकसभा निवडणूक घेण्यावर स्थगिती दिली आहे.
Pune By Poll Election: पुणे लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुका (Pune By Poll Election) कधी जाहीर होणार? असा प्रश्न राज्याला पडला होता. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पोटनिवडणूक घेण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थगिती दिली आहे. या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली त्यानंतर हा निर्णय देण्यात आला आहे.
पुणे लोकसभा पोट निवडणूक घेण्याचे निवडणूक आयोगाला मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले होते. या आदेशाला निवडणूक आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावरच आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत पुणे लोकसभा निवडणूक घेण्यावर स्थगिती दिली आहे. सार्वत्रिक निवडणुकीला थोडाच वेळ बाकी आहे, त्यामुळे पोटनिवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. या संदर्भातील पुढील सुनावणी सात आठवड्यांनी होणार आहे. पोटनिवडणुकांबाबत कायद्याची स्पष्टता करू असेही निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
गिरीश बापट यांच्या निधनामुळे जागा रिक्त
पुणे लोकसभा मतदार संघाते भाजपचे गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर पुणे मतदारसंघाची जागा रिक्त आहे.. त्यानंतर काही महिन्यात दोन्ही मतदार संघात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता होती. निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीची कुठलीही हालचाल नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आदेश दिले होते. गिरीश बापट यांचं 29 मार्च रोजी निधन झालं होतं. 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपत आहे. आगामी लोकसभेची निवडणूक काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे एक वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ शिल्लक असल्यास निवडणूक घेणं बंधनकारक असतं.
लोकसभा निवडणुकीतच पुणे मतदारसंघाचा खासदार निवडला जाणार
पुणे लोकसभा पोटनिवडणूक घेण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं निवडणूक आयोगाला दिले होतेय याविरोधात निवडणूक आयोगात सुप्रीम कोर्टात अपील करण्यात आले होते. कोर्टाच्या या निर्णयाला जर सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली त्यामुशे पोटनिवडणूक होणार नाही, थेट लोकसभा निवडणुकीतच पुणे मतदारसंघाचा खासदार निवडला जाणार आहे.