एक्स्प्लोर

Pune News : पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती

Indrayani River Bridge Collapses : रविवार असल्याने पर्यटनस्थळ असलेल्या कुंडमळा येथे पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. त्याचवेळी हा पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. 

पुणे : मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली असून तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळला आहे. त्यामध्ये अनेक पर्यंटक इंद्रायणी नदीमध्ये बुडाले असून 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामध्ये काही लहाण मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

पुण्यातील मावळमध्ये कुंडमळ्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करतात. त्यातच या ठिकाणचा पूल कोसळला. ही घटना रविवारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे पोलिस दाखल झाले आहेत. कुंडमळा नदी ओलांडण्यासाठी, या बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी पूल आहे. हाच पूल कोसळला आहे. 

Pune River Bridge Collapses :  रविवार असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी

रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक त्या ठिकाणी उपस्थित होते. काही जण पुलावर उभारले होते. तेव्हा हा पूल कोसळल्याने ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये नेमके किती जण बुडाले आहेत हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. अंदाजे 20 ते 25 जण बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Indrayani River Bridge Collapses :  वाहून गेलेल्यांमध्ये लहाण मुलांचाही समावेश

कुंडमळा या ठिकाणी इंद्रायणी नदीवर एक जुना पूल आहे. या पुलावर अनेक पर्यटक उपस्थित होते. सुट्टीचा दिवस असल्याने या ठिकाणी मोठी गर्दी होती. त्यातच हा पूल कोसळल्याने अनेक जण वाहून गेले. यामध्ये काही लहान मुलेही असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

कुंडमळामध्ये ही दुर्घटना घडल्यानंतर या ठिकाणी एनडीआरएफचे पथक दाखल झालं असून बचाव कार्य सुरू आहे. तसेच या ठिकाणी अग्निशमन दलही पोहोचल्याची माहिती आहे. या ठिकाणी अजूनही काही पर्यंटक अडकले आहेत, त्यांना वाचवलं जात आहे. या ठिकाणी गर्दी करु नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

Pune Bridge Collapses : पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना नाही

कुंडमळा हे ठिकाण पर्यटनस्थळ असून हे ठिकाण धोकादायक असल्याचं सांगितलं जातय.  पावसाळ्यात, विशेषतः शनिवार आणि रविवारी या ठिकाणी पर्यंटक मोठी गर्दी करतात. या ठिकाणी नदीवर जुना पूल आहे. त्याचीही डागडूजी करण्यात आली नाही. असं असलं तरी प्रशासनाने त्यांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याचं दिसून येतंय. त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.

पुणे परिसरात गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याचा प्रवाहही मोठा आहे. असं असूनही पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. 

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकून मुलीचं अपहरण, धक्कादायक घटनेनं इंदापूर हादरलं
आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकून मुलीचं अपहरण, धक्कादायक घटनेनं इंदापूर हादरलं
Ajit Pawar plane crash : विमानाची शेपटी पूर्णपणे सुस्थितीत, मग ब्लॅक बॉक्स जळला कसा ? मिटकरींचा सवाल
Ajit Pawar plane crash : विमानाची शेपटी पूर्णपणे सुस्थितीत, मग ब्लॅक बॉक्स जळला कसा ? मिटकरींचा सवाल
Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या अपघातावर पार्थ आणि सुनेत्रा पवारांचं म्हणणं काय?; रोहित पवारांनी पहिल्यांदाच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजितदादांच्या अपघातावर पार्थ आणि सुनेत्रा पवारांचं म्हणणं काय?; रोहित पवारांनी पहिल्यांदाच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
Ajit Pawar Plane Crash: दोन्ही रेकॉर्डरचे नुकसान, पण L3 संभाषणाचा डेटा मिळाला; अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच अधिकृत स्पष्टीकरण, नेमकं काय काय म्हटलंय?
दोन्ही रेकॉर्डरचे नुकसान, पण L3 संभाषणाचा डेटा मिळाला; अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच अधिकृत स्पष्टीकरण, नेमकं काय काय म्हटलंय?

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Super-8 Schedule : भारतासमोर समोर सुपर 8 मध्ये कोणाचं आव्हानं? 'या' दिवशी झिम्बॉब्वे विरुद्ध सामना, संपूर्ण वेळापत्रक 
भारतासमोर समोर सुपर 8 मध्ये कोणाचं आव्हानं? 'या' दिवशी झिम्बॉब्वे विरुद्ध सामना, संपूर्ण वेळापत्रक 
धक्कादायक, जळगावात पोलीस दलाच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर 1 कोटी 33 लाखांचा अपहार, आरोपी पोलीस उपनिरीक्षक फरार
जळगावात पोलीस दलाच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर 1 कोटी 33 लाखांचा अपहार, आरोपी पोलीस उपनिरीक्षक फरार
Vaibhav suryavanshi: तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
मोठी बातमी! ZP झाल्या आता ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल; कामाला लागा, मंत्रालयातून आदेश जारी
मोठी बातमी! ZP झाल्या आता ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल; कामाला लागा, मंत्रालयातून आदेश जारी
एबीपी इम्पॅक्ट... उपसचिव मिलींद शेणॉय यांची उचलबांगडी; अजित दादांच्या निधनादिवशीच अल्पसंख्यांक प्रमाणपत्रांचे वाटप
एबीपी इम्पॅक्ट... उपसचिव मिलींद शेणॉय यांची उचलबांगडी; अजित दादांच्या निधनादिवशीच अल्पसंख्यांक प्रमाणपत्रांचे वाटप
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
महापशुधन एक्स्पोसाठी 3 कोटींचा मंडप, स्वत:वरील गाण्यासाठी आनंद शिंदेंना कोट्यवधी दिले; करुणा शर्मांचा गंभीर आरोप
महापशुधन एक्स्पोसाठी 3 कोटींचा मंडप, स्वत:वरील गाण्यासाठी आनंद शिंदेंना कोट्यवधी दिले; करुणा शर्मांचा गंभीर आरोप
भारत-अमेरिका व्यापारी करार अंतिम टप्प्यात; भारतीय टीम पुढील आठवड्यात US दौऱ्यावर 
भारत-अमेरिका व्यापारी करार अंतिम टप्प्यात; भारतीय टीम पुढील आठवड्यात US दौऱ्यावर 
Embed widget