Pune Junnar Yatra Accident : मोठा अनर्थ टळला! जुन्नरच्या यात्रेतील बगाड मधोमध तुटलं; आठ-दहा फुटांवरून मानकरी खाली कोसळले अन्...
पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील यात्रेत पारुंडे येथील ब्रम्हनाथ यात्रेचं आकर्षण असणारं बगाड मधोमध तुटलं. मात्र या घटनेत कोणालाही ईजा झाली नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Pune Junnar Yatra Accident : पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील यात्रेत पारुंडे येथील ब्रम्हनाथ यात्रेचं आकर्षण असणारं बगाड मधोमध तुटलं. मात्र या घटनेत कोणालाही ईजा झाली नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला. एका बाजूचे मानकरी आठ-दहा फुटांवरून खाली कोसळले. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात ही कैद झाला. काल सायंकाळी ही घटना घडली. यात्रेचा उत्साह शिगेला पोहचला होता. बगाड ग्रामपंचायतीसमोर आलं होतं. बगाडच्या दोन्ही बाजूला मानकरी होते. आठ ते दहा फूट हवेत मानकरी असताना, बगाड प्रदक्षिणा घेत होतं. तेव्हाच बगाड मधोमध तुटलं आणि सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. एका बाजूचे मानकरी आठ ते दहा फुटांवरून खाली कोसळल्याने खळबळ उडाली होती. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
