Pune : पुणे जैन बोर्डिंग जमीन लाटल्याचे प्रकरण, लोकांचा प्रश्नाचा भडीमार, अधिकारी आणि ट्रस्टींना भांडावून सोडले
Pune Jain Boarding Case : पुण्यातील जैन मंदिर हे 90 वर्षांहून अधिक जुने असल्याचं एका मूर्तीवरून स्पष्ट झालं आहे. सध्या या जागेवरील स्थिती 'जैसे थे' ठेवण्याचा आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिला आहे.

पुणे : शहराती मॉडेल कॉलनी येथील सेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगच्या (Pune Jain Boarding) जैन मंदिरासह परिसरातील जागा आणि मंदिर गहाण ठेवून तब्बल 70 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्यानंतर मोठा वाद पेटला आहे. आज इथे मंदिर आहे की नाही, असेल तरी किती मोठे याची मोजणी करण्यासाठी शासकीय कर्मचारी आले होते. त्यांनी मोजणी केली. सोबत आदेशाप्रमाणे ट्रस्टी उपस्थित होते. इथे गोंधळ झाला. यावेळी लोकांनी अनेक प्रश्न विचारून ट्रस्टींना भाडांवून सोडले. याच दरम्यान एक याचिकाकर्त्यांनी 90 वर्षे जुनी एक मूर्ती दाखवली. त्यामुळं मंदिर किती जुने आहे हेही स्पष्ट झाले.
Bireshwar Cooperative Credit Society : कर्नाटकातील बिरेश्वर संस्थेचे 50 कोटींचे कर्ज
या व्यवहारात 8 ऑक्टोबर 2025 रोजी कर्नाटकमधील बिरेश्वर क्रेडिट सोसायटीने 50 कोटी आणि बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेने 20 कोटी रुपये कर्ज म्हणून मंजूर केले. कोणतीही चौकशी किंवा कायदेशीर प्रक्रिया न करता हा गहाण व्यवहार केला गेला.
या प्रकरणात एका विद्यार्थ्याने सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर त्याला कर्नाटक पोलिसांकडून धमक्या मिळाल्या आहेत. पुढे अॅड. योगेश पांडे यांनी या व्यवहाराविरुद्ध कायदेशीर आक्षेप घेतला आहे. धर्मादाय आयुक्तांनी या प्रकरणाची तातडीने सुनावणी केली असून सध्या या जागेवरील स्थिती 'जैसे थे' राहणार असल्याचा आदेश दिला आहे.
जैन समाजात या प्रकरणामुळे मोठा संताप व्यक्त होत असून, या जागेच्या बेकायदेशीर विक्रीविरोधात मोठे जनआंदोलन आणि मोर्चा काढण्यात आला आहे. काही विश्वस्तांनी बेकायदेशीरपणे जागा विकल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणामुळे जैन समाजाचा आणि पुणेकरांचा मोठा रोष आहे.
धर्मादाय आयुक्तांचा निर्णय आणि पुढील सुनावणी या प्रकरणाच्या भविष्याची दिशा ठरतील, पण सध्या या विक्रीवर तात्पुरती स्थगिती आहे. या प्रकरणात विशेष लढा चालू आहे आणि कायदेशीर लढाया सुरू आहेत.
Pune Jain Boarding Land Scam : प्रकरण नेमकं काय?
- मॉडेल कॉलनीतील जैन मंदिर गहाण ठेवून 70 कोटींचा व्यवहार
- कर्नाटकातील बिरेश्वर क्रेडिट सोसायटी आणि बुलढाणा बँकेचा कर्ज व्यवहार.
- अॅड. योगेश पांडे यांचा कायदेशीर आक्षेप.
- धर्मादाय आयुक्तांनी तातडीने सुनावणी, स्थगिती आदेश.
- जैन समाज आणि पुणेकरांनी विरोध आणि मोर्चा काढला.
- प्रकरणाची आगामी सुनावणी 28 ऑक्टोबर 2025 रोजी ठरलेली
- हा वाद धार्मिक, सामाजिक तसेच कायदेशीर दृष्टीने महत्त्वाचा असून पुण्यातील जैन समाजाचा आणि परिसराचा गूढ प्रश्न बनला आहे.
ही बातमी वाचा:

























