एक्स्प्लोर
सीसीटीव्हीमुळे हिट अँड रन उघड, पुणे पोलिस म्हणतात साधा अपघात
पुणे : पुण्यातल्या कोंढवा-खराडी रस्त्यावर 29 जुलैला घडलेला अपघात हा हिट अँड रन असल्याचं समोर आलं आहे. अपघातात जखमी झालेल्या तरुणीच्या भावानं या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आणल्यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली. सध्या अपघातग्रस्त सुनिताकुमारीवर रुबी रुग्णालयात उपचार सुरु असून तिच्या मेंदूला जबर इजा झाली आहे.
33 वर्षीय सुनिताकुमारी ही खराडीच्या आयटीपार्कमध्ये आयटी प्रोफेशनल आहे. 29 जुलैला कामावर जात असताना महंमदवाडीजवळ मागून आलेल्या भरधाव ओम्नी कारनं सुनिताकुमारच्या दुचाकीला धडक दिली होती. धडकेनंतर ओम्नी चालक तसाच पुढे निघून गेला. अपघातानंतर रस्त्यावर जमलेल्या पादचाऱ्यांनी सुनिताकुमारीला दवाखान्यात नेलं होतं.
पोलिसांनी मात्र तरुणीचं दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळे पडून तिचा अपघात झाल्याची नोंद केली होती. मात्र सीसीटीव्हीमध्ये ओम्नीचालकाने तरुणीला धडक दिल्याचं दिसत आहे. त्यामुळे केवळ अपघाताचा गुन्हा दाखल न करता हिट अँड रनचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी जखमी तरुणीच्या भावानं केली आहे.
तिच्या भावानं बंगळुरूहून येऊन पोलिसांकडे तक्रार केली आणि सीसीटीव्ही फुटेज काढून घेतलं. 15 ऑगस्टला त्यानं पोलिस आय़ुक्तांची भेट घेत या प्रकरणी लक्ष घालण्यास सांगितलं. पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवल्यामुळे या प्रकरणाचा तपास रखडला. मात्र तिच्या भावानं ते सीसीटीव्ही फुटेज दाखवत हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे संबंधित ओम्नीचा तपास घेण्याची मागणी केली.
सीसीटीव्ही व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement