एक्स्प्लोर

Worli Hit And Run: बुलडोझर बाबा कुठे आहेत?; वरळीतील हिट अँड रन प्रकरणात रविंद्र धंगेकरांची उडी, कारवरील लोगोवरही बोलले!

Worli Hit And Run: 24 तास उलटले तरी सदर घटनेतील अद्याप मुख्य आरोपी फरार असल्याने आता विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Worli Hit And Run मुंबई: मुंबईतल्या वरळी भागात भरधाव वेगात (Worli Hit And Run) बीएमडब्ल्यू कार चालवून महिलेला चिरडण्याच्या प्रकरणात मिहीर शहा (Mihir Shah) हे नाव समोर आलं आहे. आरोपी मिहीर शहा हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राजेश शहा यांचा मुलगा आहे. राजेश शहा (Rajesh Shah) यांना अटक करण्यात आली आहे. मिहीर शहाचा शोध मात्र पोलीस घेत आहेत. 24 तास उलटले तरी सदर घटनेतील अद्याप मुख्य आरोपी फरार असल्याने आता विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

बुलडोझर बाबा कुठे आहेत?, पुण्यातल्या घटनेनंतर तर बुलडोझर घेऊन कारवाई केली. आता स्वत:च्या पक्षातील पदाधिकाऱ्याचा मुलगा सापडला आहे. तो रात्री मद्यपान करून गाडी चालवत आहे. हे योग्य आहे का ? कायदा हा फक्त सर्व सामान्यांसाठीच आहे का ? मुलाचा बाप सापडतो मुलगा का सापडत नाही?, असा सवाल काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी उपस्थित केला आहे. गाडीवरील नंबरप्लेट व लोगो हटवणाऱ्यांवरही कारवाई व्हायला हवी, अशी मागणी रविंद्र धंगेकर यांनी केली आहे.

सचिन आहिर काय म्हणाले? 

वरळी हिट अॅड रन प्रकरणात पारदर्शक कारवाई व्हायला हवी. 24 तास उलटले तरी अद्याप मुख्य आरोपी फरार आहे. मुख्य आरोपीची वैद्यकिय चाचणीतून अनेक खुलासे समोर येऊ शकतात. पोलिसांना आरोपी अद्याप कसा सापडत नाही.गाडीवरील पक्षाचे चिन्ह हटवणयाचा प्रयत्न झाल्याचे दिसत आहे. यावर कुठेतरी संशयाला वाव मिळत आहे. आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही. मात्र कारवाई ही पारदर्शक व्हायला हवी, असं ठाकरे गटाचे आमदार सचिन आहिर म्हणाले. तर या सरकारमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. यातील आरोपीला योग्य कारवाई झाली पाहिजे. कायदा न पाळणाऱ्यांना धाक उरलेला नाही, असा आरोप ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी केला आहे.

राजेश शहा यांना अटक

मिहीर शहा यास पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी मिहीरचे वडील राजेश शहा आणि चालक राजऋषी बिडावत यांना अटक केली असल्याच्या वृत्ताला पोलिस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी दुजोरा दिला आहे.

आरोपी दारूच्या नशेत

24 वर्षीय मिहीरही व्यावसायिक आहे. तो दारूच्या नशेत असताना हा अपघात घडल्याचा संशय आहे. तो रात्री जुहू येथील एका बारमध्ये मित्रांसह दारू पार्टीसाठी गेला होता. बारमधून निघाल्यावर तो गोरेगावला गेला. मिहीर फरार झाल्यामुळे तो दारूच्या नशेत होता की नाही, याबाबत निश्चित काही निष्कर्ष काढणे शक्य नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

वरळी हिट अँड रन प्रकरणी शिवसेनेचा उपनेता पोलिसांच्या ताब्यात, मुख्य आरोपी फरार, शिंदे म्हणाले...

वरळीत हिट अँड रनची घटना; आदित्य ठाकरे थेट पोलीस स्थानकात, राजकीय रंग न देण्याचं आवाहन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण, ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले
आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण, ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pratibha Pawar Baramati : नातवाच्या प्रचारासाठी आज्जी मैदानात, प्रतिभाताई पवार युगेंद्रच्या प्रचारातMuddyach Bola Yeola Constituency : छगन भुजबळांच्या मतदारसंघातून 'मुद्याचं बोला'Asaduddin Owaisi Exclusive : माझी प्रत्येक वस्तू-बॅग चेक करा, देशप्रेमाशिवाय काही सापडणार नाहीAvinash Jadhav Thane Vidhan Sabha | हातात फलक घेऊन एकदा संधी द्या, अविनाश जाधवांचं ठाणेकरांना आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण, ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले
आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण, ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
भुजबळांनी मर्यादा शिल्लक ठेवल्या नाहीत; येवल्यातून शरद पवारांचा हल्लाबोल, अजित पवारही लक्ष्य
भुजबळांनी मर्यादा शिल्लक ठेवल्या नाहीत; येवल्यातून शरद पवारांचा हल्लाबोल, अजित पवारही लक्ष्य
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
CM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारला
CM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारला
Crime News: रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
Embed widget